Husband & wife: ...म्हणून पती-पत्नीमध्ये भांडण होणं आहे आवश्यक, ही आहेत चार आश्चर्यकारक कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 02:46 PM2023-02-04T14:46:41+5:302023-02-04T14:53:59+5:30

Husband & wife: अनेक मानसशास्त्रतज्ज्ञांच्या मते पती-पत्नीमध्ये भांडणं वाद होत राहिले पाहिजेत. कारण त्यामुळे नातं भक्कम होतं. आज आपण जाणून घेऊयात नात्यामध्ये हलकं-फुलकं भांडण होणं का आवश्यक आहे त्यााबाबत.

संसार करताना पती-पत्नीमध्ये भांडण होणं सर्वसामान्य बाब आहे. कारण जेव्हा दोन लोक एकत्र राहतात, तेव्हा त्यांच्यामध्ये थोडे वादविवाद होणं साहजिकच आहे.. मात्र कधीही ही भांडणं फार लांबवता कामा नयेत. तसेच कुठलेली मतभेद हे लवकरात लवकर मिटवणे नातं टिकवण्यासाठी आवश्यक असतात.

अनेक मानसशास्त्रतज्ज्ञांच्या मते पती-पत्नीमध्ये भांडणं वाद होत राहिले पाहिजेत. कारण त्यामुळे नातं भक्कम होतं. आज आपण जाणून घेऊयात नात्यामध्ये हलकं-फुलकं भांडण होणं का आवश्यक आहे त्यााबाबत. मात्र या भांडणाचा अर्थ केवळ शाब्दिक वाद आहेत. त्यात नात्यामधील शारीरिक हिंसेला कुठलंही स्थान देता कामा नये.

जेव्हा तुम्ही कुठल्याही कारणावरून पार्टनरला थांबवता, किंवा त्यांना सुधारण्यासाठी किरकोळ रागावता, तेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी किती चांगला विचार करता, हे दिसून येते. जर तुम्ही पार्टनरच्या कुठल्याही अॅक्शनवर रिअॅक्ट करत नसाल तर तुम्हाला त्यांची अजिबात काळजी नसल्याची भावना पार्टनरच्या मनात निर्माण होऊ शकते.

अनेकदा आपण रागावर कंट्रोल करून आपल्या मनातील गोष्टी लपवतो. मात्र जेव्हा रागावतो, तेव्हा मनातील राग बाहेर पडतो. तेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा राग येतो, हे पार्टनरला समजते. तसेच पुढच्या काळात अशी गोष्ट करणे ते टाळतात.

अनेकदा जेव्हा जोडप्यांमध्ये कडाक्याचं भांडण होतं तेव्हा अनेक गोष्टींवर तोडगा निघतो. तसेच दोघेही कुठल्यातरी सकारात्मक मुद्द्यावर पोहोचतात. असे वादविवाद भविष्याची दिशा निश्चित करण्यासाठी आवश्यक असतात. त्यातून पती-पत्नीमधील नातं अधिक भक्कम होतं.

मानसशास्त्रानुसार तुम्ही केवळ त्याच लोकांसोबत भांडता, ज्यांना आपले समजतात. जर पती-पत्नीमध्ये वादावादी होत असेल तर त्याचा अर्थ दोघांनाही एकमेकांमध्ये आपलेपणा दिसून येतो. हा दृढ नात्यासाठी सुखद संदेश आहे.