शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

असे एन्जॉय करा एन्गेजमेंट आणि लग्नाच्या मधले सुंदर क्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 1:05 PM

1 / 6
कोणत्याही लग्न होणाऱ्या जोडप्यासाठी एन्गेजमेंट आणि लग्न यामधला कालावधी फारच स्पेशल असतो. दोघांच्याही मनात उत्सुकता, हुरहुरता, भीती, प्रश्न या सर्वच गोष्टी सुरू असतात. जर हे लग्न अरेंज असेल तर मग या गोष्टी अधिकच असतात. लव्ह मॅरेजमध्ये दोघेही एकमेकांना आधीच ओळखत असल्याने वरील गोष्टी फार होत नाहीत. मात्र ज्यांचं अरेंज आहे त्यांनी हा एंगेजमेंट आणि लग्नामधील काळ आणखी खास करण्यासाठी वापराला तर काय मजा येईल ना? जर लग्न जुळल्यानंतर तुम्हाला तुमच्या होणाऱ्या बायकोला भेटण्याची परवानगी मिळत असेल आणि तुम्हाला हा कालावधी एन्जॉय करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. (Image Credit : cartier.ch)
2 / 6
नेहमी प्रेम दाखवणं चुकीचं - अनेकदा पार्टनर्स एकमेकांवर एम्प्रेशन टाकण्यासाठी फारच जास्त प्रेम दाखवतात. जे चुकीचं आहे. एका मॅट्रिमोनिअल साइटनुसार, आठवड्यातून दोन ते तीन वेळा झालेली छोटी भांडणे प्रेम वाढवतात. याने जोडीदारावरील प्रेम कायम राहतं. (Image Credit : www.naukrinama.com)
3 / 6
रोमान्ससाठी हीच योग्य वेळ - मनात कितीतरी गोष्टी सुरू असताना या सुंदर क्षणांचा तुम्ही रोमान्ससाठी वापर करू शकता. लग्नानंतर घराच्या जबाबदारीत तुमचं प्रेम कितीही नाही म्हटलं तरी कुठेतरी हरवून जातं. रोमान्ससाठी तुम्हाला वेळ काढणही कठीण होऊन बसतं. अशात या क्षणांचा तुम्ही पूर्ण आनंद घेऊ शकता.
4 / 6
सपप्राइज क्रिएट करा - प्रेम आणखी स्ट्रॉंग करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. जसे की, एखादं सुंदर गिफ्ट किंवा सरप्राइज किस. किसमुळे तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमधील अंतर कमी करतो. पण लग्नाआधी काही सीमा ठेवलेल्या कधीही चांगल्या. (Image Credit : www.joe.ie)
5 / 6
एकमेकांना समजून घ्या - केवळ मुलींनाच मिस्टर राइटचा शोध नसतो तर मुलांनाही एका अशा मुलीचा शोध असतो ज्या त्यांच्या लाइफमध्ये मिस परफेक्ट बनतील. त्यामुळे हा वेळ तुम्ही एकमेकांना समजून घेण्यासाठी, एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी वापरा. याने तुमचं पुढील आयुष्य सुखकर होण्यास मदत होईल. (Image Credit : vaisnavafamilyresources.org)
6 / 6
गैरसमजांपासून दूर रहा - जर तुमचा पार्टनर तुम्हाला एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी फोर्स करत असेल तर कदाचित तुमच्याबाबत जाणून घेण्यासाठी तो तसं करत असावा. त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या. एकमेकांबाबत काहीही गैरसमज बाळगू नका. (Image Credit : www.entertales.com)
टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपmarriageलग्न