लहान मुलं लवकर झोपत नाहीत का?, 'या' टिप्स करतील मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 13:28 IST2019-10-17T13:16:35+5:302019-10-17T13:28:12+5:30

लहान मुलं खूप मस्तीखोर असतात. तसेच झोपतानाही खूप नखरे करतात. मुलं लवकर झोपत नसतील तर 'या' टिप्स तुम्हाला मदत करतील.
उपाशी पोटी झोपवू नका
लहान मुलांना उपाशी पोटी झोपवू नका कारण तसं केल्यास रात्री भूक लागल्यावर ते झोपेतून उठतात. तसेच पोट भरलेलं असताना मुलांना शांत झोप लागते.
झोपण्याची वेळ निश्चित करा
लहान मुलांच्या झोपण्याची एक वेळ निश्चित करा म्हणजे मुलं त्यावेळेत शांत झोपतील.
पाळण्यात झोपवताना काळजी घ्या
लहान मुलांना पाळण्यात झोपण्याची सवय असते. मात्र पाळण्यात झोपवताना काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं.
अंघोळ घाला
लहान मुलांना झोपण्याआधी अंघोळ घाला तसेच मालिश करा. यामुळे मुलांचं शरीर रिलॅक्स होतं आणि छान झोप लागते.
आरोग्याची काळजी घ्या
लहान मुलांची तब्येत ठीक नसल्यास ते चिडचिड करतात. तसेच नीट झोपत नाहीत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.
गोष्टी सांगा
मुलांना गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे त्यांना झोपण्याआधी एखादी छानशी गोष्ट सांगा म्हणजे ते गोष्ट ऐकताना झोपी जातील.