Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 13:36 IST2025-05-23T13:15:04+5:302025-05-23T13:36:22+5:30

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे फरार झाले होते. आज पहाटे त्यांना पोलिसांनी अटक केली.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. . या दोघांना आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

वैष्णवीचा मृत्यू झाल्यापासून सासरा राजेंद्र हागवणे फरार होता. दरम्यान, राजेंद्र हागवणे सात दिवस कुठे फरार होते याची माहिती पोलिसांनी दिली.

फरार झाल्यापासून राजेंद्र हागवणे याने सात दिवसात वेगवेगळ्या गाड्यांमधून प्रवास केला.

१७ मे रोजी जर राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता. तसेच २२ मे रोजी पुन्हा पुण्यात परतल्याचे पोलीस रेकॉर्डद्वारे समोर आले आहे.

यावेळीच पुणे पोलिसांनी राजेंद्र हागवणे विरोधात कारवाई का केली नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

१७ मे रोजी राजेंद्र हगवणे हा औंध हॉस्पिटल , मुहूर्त लॉन्स, (थार गाडीने), वडगाव मावळ, पवना डॅम (फार्म हाऊस),आळंदी येथे लॉजवर गेला.

१८ मे या दिवशी राजेंद्र हगवणे हे वडगाव मावळ,पवना डॅम (बंडू फाटक कडे बलेनो गाडीने) गेले.

१९ मे आणि २० मे रोजी राजेंद्र हगवणे हे पसरणी मार्गे कोगनोळी (हॉटेल हेरीटेज) येथे गेला.

राजेंद्र हगवणे २१ मे रोजी कोगनोळी ( प्रीतम पाटील यां मित्र्याच्या शेतावर) गेला यानंतर २२ मे रोजी पुन्हा पुण्याला परत आला.