Priyanka Chopra And Nick Jonas : प्रियांका चोप्राने नुकतेच पती निक जोनससोबत काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ...
Love Relationship After Marriage: विवाहबाह्य संबंध का वाढू लागले, पुरुषाला दुसरीची किंवा बाहेरचीची गरज का वाटू लागली? महिलेला दुसरा पुरूष का आवडायला लागला? याची कारणे बरीच असतील... ...
how long should we soak dryfruits : how many hours should we soak dry fruits : benefits of soaking almonds overnight : कोणते ड्रायफ्रूट्स किती वेळ भिजवावे आणि त्याचे आरोग्याला काय फायदे होतात ते पाहा... ...
पुणे : मुस्लीम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू असून, त्याची गजबज शहरात पहायला मिळत आहे. कोंढवा, कौसर बाग, मोमीनपुरा, नाना पेठमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. रमजाननिमित्त बाजारात खाण्याचे पदार्थ, अत्तर. सुरमा, इत्यादी गोष्टी पाहायला मिळत आहेत. ( सर्व छायाचित्रे :- तन्मय ठोंबरे )
विविध प्रकारच्या अत्तरलादेखील मागणी वाढली आहे. तसेच चंदन, उद, मोगरा, जन्नत उल फिरदोस, मुस्क हे प्रकार खरेदी केले जातात.
रमजानची स्पेशल ड्रिंक म्हणजे हैद्राबादी ताहुरा, दिवसभर उपास केल्यानंतर रोजा इफ्तारच्या वेळेस हे शरबत घेतले जाते. ज्याने पोटाला थंडावा मिळतो.
नागरिक सुरमाची खरेदी मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. डोळ्यांना थंड वाटावे म्हणून हा डोळ्यांत लावला जातो. सध्या सुरमामध्ये विविध रंग आले आहेत.
नाती रमजान हा संयम व त्यागाचा, समर्पणाचा महिना. इस्लाम धर्मियांच्या सर्वात पवित्र सणाचा रौनक हा महिना. महिनाभर रोजे (कडक उपवास) पार पाडल्यानंतर येते ती रमजान ईद. म्हणजे आनंदोत्सवच.
काळे खजूर, शेवया, हैद्राबादी ताहुरा, गुलाबाचा रूह अफजा खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
घरातील प्रत्येकजण ईदच्या दिवशी नवीन कपडे परिधान करून नटून थटून सज्ज असतो, ईदच्या नमाजपठणासाठी. मतभेद विसरुन गळाभेट घेतली जाते.
बच्चे कंपनी मोठ्यांचे आर्शीवाद घेतात आणि हक्काने ईदीही मिळवितात. या दिवशी सर्वांना आपल्या आनंदात सहभागी करून घेतले जाते.