Pune heavy rain : शहरात अवकाळी पावसाचे तांडव; पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 17:12 IST2026-04-02T17:00:47+5:302026-04-02T17:12:35+5:30

पुण्यात दुपारनंतर धुव्वादार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले आहे. अनेक भागात रस्त्यावरून वाहने पाण्यात वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. रस्त्यांवर फांद्या कोसळू लागल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात झालेल्या पावसाने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुण्यात दुपारनंतर धुव्वादार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले आहे.

अनेक भागात रस्त्यावरून वाहने पाण्यात वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. रस्त्यांवर फांद्या कोसळू लागल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात झालेल्या पावसाने पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

पुण्यातील सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी, पिंपरी चिंचवड, औंध, बाणेर, बालेवाडी भागांत गारांसह जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसू लागले आहे.

अनेकांनी पावसात भिजण्यापेक्षा रस्त्याच्या कडेला आडोशामध्ये थांबणे पसंत केले. ढगांच्या गडगडाटासोबत विजेच्या कडकडाट ऐकू येत आहे. सर्वत्र पावसाने धुमाकूळ घातला आहे. रस्त्यांवरून नद्या वाहू लागल्याने रस्ते मोकळे दिसू लागले आहेत. 

शहरात सोमवारपासून गारांसह मुसळधार पाऊस पडत आहे. दररोज दुपारपर्यंत वातावरण गरम असते. त्यानंतर पावसाला सुरुवात होते. अशा वातावरणामुळे पावसाळा सुरु झाल्यासारखे पुणेकरांना वाटू लागले आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू शिवारात उभे असलेले हिरवेगार पीक क्षणांत सपाट झाल्याचे चित्र पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.वर्षभराच्या कष्टाचे स्वप्न डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी भावुक झाले.