Pune Metro: पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होणार; लवकरच मेट्रो धावणार, पाहा 'या' स्टेशनचे आकर्षक Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 16:47 IST2022-01-24T16:42:03+5:302022-01-24T16:47:37+5:30
पुणे मेट्रोचे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पिंपरीत तर फुगेवाडी ते पिंपरी चिंचवड महापालिका मेट्रोची चाचणीही झाली आहे. तर पुणे शहरात मेट्रो स्टेशनचे काम निम्म्याच्या वर झाल्याचे दिसून येत आहे. आता लवकरच पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. काही महिन्यातच नागरिकांना मेट्रोतून प्रवास करण्याचा आनंद लुटता येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोकमतने कर्वे रस्त्यावरील मेट्रो स्टेशनची पाहणी केली. या स्टेशनचे अर्ध्याच्या वर काम झाल्याचे दिसून आले आहे. ( सर्व छायचित्रे :- तन्मय ठोंबरे )