Photos: टाळ - मृदंग अन् माऊलींचा जयघोष; आळंदीत वैष्णवांचा मेळा, पहा आकर्षक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 17:05 IST2023-06-11T16:55:50+5:302023-06-11T17:05:25+5:30

टाळ - मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर - फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. आज सायंकाळी माउलींच्या पालखी सोहळ्याचे मुख्य मंदिरातून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. (सर्व छायाचित्रे - भानुदास पऱ्हाड)

आषाढी वारी प्रस्थान सोहळयासाठी लाखो वारकरी अलंकापुरीत दाखल

आषाढी वारी सहभागी झालेले वारकरी सेल्फी काढण्यात दंग

माऊलींच्या मुख्य मंदिरात नतमस्तक होताना महिला वारकरी

टाळ - मृदंगाच्या गजरात मग्न वारकरी महिला

इंद्रायणी तीरावर मृदुंगाच्या तालावर बेभान होऊन नाचणारे वारकरी

इंद्रायणी तीरावर जमलेले लाखो वैष्णव

इंद्रायणी पाण्यात स्नान करताना असंख्य वारकरी

माऊली थोड्याच वेळात प्रस्थानासाठी सज्ज असताना वारकरी इंद्रायणी तीरावर प्रतीक्षेत