PHOTOS: पुणे रेल्वे स्थानकावर शंटींग करताना डेमू रेल्वेचा अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 12:28 IST2022-01-21T12:12:20+5:302022-01-21T12:28:30+5:30
पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी साडे नऊच्या सुमारास डेमु रेल्वेचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ज्या रेल्वेचा अपघात झाला आहे ती पुणे - दौंड दरम्यान धावते. ही रेल्वे स्थानकावर शंटींग (रेल्वे रुळ बदलने) करताना हा अपघात घडला. त्यामुळे पुणे - दौड जाणारी सकाळची डेमु रद्द करावी लागली. याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. पुणे - दौंड दरम्यान धावणारी ही रेल्वे ट्रेन यार्डात जाताना हा अपघात घडला. शंटींग करताना यात प्रवाशी नव्हते त्यामुळे कोणतीही जीवितहाणी झाली नाही.

पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी साडे नऊच्या सुमारास डेमु रेल्वेचा अपघात, त्यामुळे पुणे - दौड जाणारी सकाळची डेमु रद्द करावी लागली

ज्या रेल्वेचा अपघात झाला आहे ती पुणे - दौंड दरम्यान धावते

ही रेल्वे स्थानकावर शंटींग (रेल्वे रुळ बदलने) करताना हा अपघात घडला, याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहाणी झालेली नाही

पुणे - दौंड दरम्यान धावणारी ही रेल्वे ट्रेन यार्डात जाताना हा अपघात घडला


















