बाल शिवाजी, दांडपट्टा प्रात्यक्षिके अन् हत्तीवर विराजमान शिवछत्रपती राजे, स्वराज्य रथ सोहळ्याची आकर्षक छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 05:24 PM2024-02-19T17:24:11+5:302024-02-19T17:45:00+5:30

भारताच्या इतिहासातील शिवकालीन युध्दकला सादर करणाऱ्या रणरागिनी, फुलांची आकर्षक सजावट असलेला जिजाऊ मॅांसाहेब शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ, ढोलताशा पथकाचा रणगजर, सनई-चौघडयांचे मंगलमय सूर शिवभक्तांनी केलेला जय शिवाजी जय भवानीचा जयघोष अशा नयनरम्य वातावरणात पुण्यात चक्क शिवशाही अवतरली. निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे लालमहाल येथून आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा या भव्यदिव्य मिरवणुकीचे. तब्बल ९५ स्वराज्यरथांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. (सर्व छायचित्रे - कपिल पवार)

विठ्ठल रथात विराजमान छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करताना नागरिक

सोहळ्यात असंख्य लहान मुले बाल शिवाजींच्या वेशभूषेत

तरुणांची दांडपट्टा फिरवताना आकर्षक प्रात्यक्षिके

फुलांनी सजवलेल्या हत्तीवर विराजमान शिवछत्रपती राजे

सरदारांच्या स्वराज्यरथ सोहळ्यात लक्षवेधी तोफ

स्वराज्यरथ सोहळ्यात तलवारबाजी करताना मुले

स्वराज्य रथांसमोर टाळ - मृदंगाचा गजर करताना वारकरी अन् मुले

तब्बल ९५ स्वराज्यरथांची छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना

शिवजन्मोत्सव सोहळ्यात बाल शिवाजी ताशा वाजवण्यात दंग

तब्बल ९५ स्वराज्यरथांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली