शरद पवारांचा नातू फॉर्मात; 'रजनी'कन्येच्या लग्नात रोहितचा वेगळाच थाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 14:40 IST2019-02-12T13:39:37+5:302019-02-12T14:40:04+5:30

शरद पवारांचे नातू रोहित पवार हे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दौरे करताना दिसत आहेत. राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीनंतर आता, सिनेस्टार कलाकारांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहत आहेत.
रोहित पवार यांनी नुकतेच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या हिच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात मान्यवर आणि सेलिब्रिटींच्या भेटीगाठी घेत, जनसंपर्क अधिकच दांडगा केला आहे.
सौंदर्या यांच्या लग्नात रोहित यांनी रजनीकांतचे जावई धनुष यांचीही भेट घेतली. त्यांसमवेत फोटो काढण्याचा मोह रोहित यांना आवरता आला नाही.
या लग्नसोहळ्याला उपस्थित एआयएडीएमकेचे नेते एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यातून लवकरच केंद्रीय पातळीवरील नेत्यांच्या संपर्कात रोहित येत असल्याचं दिसतं.
रोहित हे शरद पवारांचे लाडके असून नुकतेच त्यांची इस्मा म्हणजेच इंडियन शुगर मिल असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर रोहित यांच नाव राज्यात अधिकच चर्चिलं गेलं.
रोहित पवार यांच्याकडे सध्या अनेक संस्थांमधील महत्त्वाची पदे आहेत. तर नुकतेच सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग जाणवत आहे, शेतकऱ्यांच्या बाधांवर जाऊन भेटी घेतल्यांतर आता सेलब्रिटींच्या लग्नालाही ते हजेरी लावत आहेत.
शरद पवारांचे नातू असणारे रोहित पवार हे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दौरे करताना दिसत आहेत. राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीनंतर आता, सिनेस्टार कलाकारांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहत आहेत.