शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जाणून घ्या, 250 वर्षापासून सुरु आहे महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या संघर्षाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 6:53 PM

1 / 6
राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यामध्ये राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपासोबत जात सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र याबाबत शरद पवारांना कोणतीही कल्पना नव्हती. अजित पवारांचा हा वैयक्तिक निर्णय होता असं सांगून पवारांना अजित पवारांना चपराक दिली.
2 / 6
१७७५-८२ च्या दशकात पेशवा राजघराण्यात सुरु असलेल्या संघर्षात नारायण पेशवे यांची हत्या करण्यात आली. पेशवा चितपावन हे ब्राम्हण होते. नारायण राव यांचे पुतणे रघुनाथ राव यांनी इंग्रजांच्या मदतीने सत्तेसाठी लढाई केली.
3 / 6
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी २००६ मध्ये काकांशी फारकत घेत मनसे या पक्षाची स्थापना झाली.
4 / 6
शरद पवार यांच्याशी फारकत घेत अजित पवारांनी भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
5 / 6
गोपीनाथ मुंडे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी भाजपाशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
6 / 6
बीड मतदारसंघातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला आहे. काही महिन्यांपूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे