Join us  

रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय

ट्रेंट बोल्टने DC चा आक्रमक ओपनर जॅक फ्रेझर-मॅकगर्क याला पहिल्या षटकात शांत ठेवले, परंतु त्यानंतर त्याने वादळी फटकेबाजी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 8:48 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Marathi Update -  दिल्ली कॅपिटल्सला सलामीवीरांनी दमदार सुरूवात करून दिली, तर राजस्थान रॉयल्सच्या अनुभवी आर अश्विनने विकेट्स घेऊन मॅच फिरवली. युझवेंद्र चहलने एक विकेट घेऊन इतिहास रचला आणि ती विकेट त्याने रिषभ पंतची मिळवली. 

RR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतला. ट्रेंट बोल्टने DC चा आक्रमक ओपनर जॅक फ्रेझर-मॅकगर्क याला पहिल्या षटकात शांत ठेवले, परंतु त्यानंतर त्याने वादळी फटकेबाजी केली. आवेश खानच्या एका षटकात जॅकने ४,४,४,६,४,६ असे फटके खेचले. जॅकने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हे वादळ रोखण्यासाठी संजू सॅसमनने चेंडू अनुभवी गोलंदाज आर अश्विनच्या हाती दिला. अश्विनने हा विश्वास सार्थ ठरवताना जॅकला माघारी पाठवले. तो २० चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५० धावांवर झेलबाद झाला आणि दिल्लीला ४.२ षटकांत ६० धावांवर पहिला धक्का बसला. त्यानंतर आलेला शे होप दुर्दैवीरित्या रन आऊट झाला. अभिषेक पोरेलने मारलेला सरळ फटका गोलंदाज संदीप शर्माने अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू शर्माच्या हाताला लागून नॉन स्ट्राईक एंडच्या यष्टिंवर आदळला आणि क्रिज सोडून पुढे गेलेला होप ( १) रन आऊट झाला. दिल्लीने पॉवर प्लेमध्ये २ बाद ७८ धावा केल्या. २० चेंडूंच्या आत ३ फिफ्टी झळकावणारा जॅक हा पहिलाच फलंदाज ठरला आणि तेही सात सामन्यांत त्याने हे केले. लोकेश राहुल, यशस्वी जैस्वाल, किरॉन पोलार्ड, सुनील नरीन आणि निकोलस पूरन यांनी प्रत्येकी २ वेळा अशी फिफ्टी मारली आहे. दोन विकेट पडल्यानंतरही अभिषेकची फटकेबाजी सुरूच होती आणि त्याने युझवेंद्र चहलचे षटकाराने स्वागत केले आणि चौकाराने शेवट केला. अश्विनने सामन्यातील दुसरी विकेट घेताना अक्षर पटेलला ( १५) घरचा रस्ता दाखवला. अभिषेकने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले अन् तेही खणखणीत सिक्स खेचून. दिल्लीने १० षटकांत ११५ धावा फलकावर चढवल्या. अश्विनच्या चतुराईसमोर दिल्ली अडखळताना दिसली आणि त्याने सेट फलंदाज अभिषेकला ६५ ( ३६ चेंडू, ७ चौकार व ३ षटकार) धावांवर माघारी पाठवले. युझवेंद्र चहलच्या फिरकीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात रिषभ ( १५) बाद झाला.  चहलची ही आयपीएलमधील २०१ वी, तर ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ३५० वी विकेट ठरली. असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. आयपीएलमध्ये २०० विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज आहे.  

टॅग्स :आयपीएल २०२४युजवेंद्र चहलरिषभ पंतराजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्स