Join us  

४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 

राजस्थान रॉयल्सला पुन्हा विजयी मार्गावर परतून प्ले ऑफमधील जागा पक्की करण्याची संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 7:58 PM

Open in App

IPL 2024, Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Marathi Update - राजस्थान रॉयल्सला पुन्हा विजयी मार्गावर परतून प्ले ऑफमधील जागा पक्की करण्याची संधी आहे. त्यांच्यासमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान आहे, जे गुणतालिकेत १० गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहेत. DC ला उर्वरित तिन्ही सामने जिंकून प्ले ऑफचे गणित गाठता येईल, पण त्यांना इतरांवरही अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे आजचा सामना रंगतदार होईल हे निश्चित. RR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतलेला निर्णय अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा ठरला. कारण, दिल्लीच्या मैदानावर यंदाच्या पर्वात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २२० पार धावा करून तीन सामने जिंकले आहेत. 

राजस्थानच्या स्फोटक फलंदाज जॉस बटलरसमोर दिल्लीच्या कुलदीप यादवच्या फिरकीचे आव्हान आहे. ९ इनिंग्जमध्ये त्याने RR च्या फलंदाजाला ३ वेळा बाद केले आहे. युझवेंद्र चहलने १ विकेट घेताच ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये तो ३५० विकेट्सचा पल्ला गाठेल. संजू सॅमसनला आयपीएलमध्ये २०० षटकार पूर्ण करण्यासाठी एक उत्तुंग फटका मारावा लागणार आहे. यशस्वी जैस्वालने आज १२वी धाव घेताच तो आयपीएलमध्ये १५०० धावांचा टप्पा गाठेल. राजस्थानच्या संघात आज दोन बदल पाहायला मिळत आहेत. ध्रुव जुरेल व शिमरोन हेटमायर यांना निगल्समुळे सामन्याला मुकले आहेत. त्यांच्याजागी शुभम दुबे व डोनोव्हन फरेरा हे खेळणार आहेत. दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये इशांत शर्मा परतला आहे, तर अफगाणिस्तानचा गुलबदीन नैब दिलल्लीकडून पदार्पण करतोय. 

ट्रेंट बोल्ट DC चा आक्रमक ओपनर जॅक फ्रेझर-मॅकगर्क याच्यासाठी पूर्ण अभ्यास करून आलेला आणि त्याने भन्नाट माराही केला. बोल्टने टाकलेला चौथा चेंडू जॅकच्या नको त्या जागी लागला आणि काही क्षणासाठी तो मैदानावर आडवा झाला होता. अभिषेक पोरेलने दुसऱ्या षटकात नाकाच्या सरळ रेषेत दोन सुरेख चौकार खेचले. त्यानंतर जॅकही सुरू झाला आणि बोल्टचे त्याने सरळ षटकार खेचून स्वागत केले. नशीबही आज जॅकच्या बाजूने दिसले आणि त्याने आवेश खानच्या गोलंदाजीवर ४,४,४,६,४,६ असे फटके खेचले. जॅकने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना दिल्लीला ५ षटकांत ५९ धावांपर्यंत पोहोचवले. हे वादळ रोखण्यासाठी संजू सॅसमनने चेंडू अनुभवी गोलंदाज आर अश्विनच्या हाती दिला. अश्विनने हा विश्वास सार्थ ठरवताना जॅकला माघारी पाठवले. तो २० चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५० धावांवर झेलबाद झाला.  

टॅग्स :आयपीएल २०२४राजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्सआर अश्विन