शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Flashback 2020 : राजकीय विधानांनी वर्ष गाजलं; पाहा कोण काय-काय म्हणालं!

By मोरेश्वर येरम | Published: December 31, 2020 5:52 PM

1 / 19
२०२० हे वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे तर लक्षात राहीलच पण महाराष्ट्राच्या राजकारणात देखील यंदाचं वर्ष अतिशय महत्वाचं ठरलं. या वर्षात राज्यातील नेत्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली. त्यापैकी निवडक विधानांवर एक नजर...
2 / 19
'राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात?': राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहेलेल्या पत्रात हे विधान केलं होतं.
3 / 19
मुंबईला पीओके म्हणणाऱ्याचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्वात बसत नाही. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे का?- उद्धव ठाकरे
4 / 19
तुम्ही जनतेचे सेवक आहात, महाराष्ट्राचे ठेकेदार नाही- कंगना राणौत
5 / 19
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करू नये- देवेंद्र फडणवीस
6 / 19
'मी कधी डॉक्टरांकडून औषधं घेत नाही, त्यांना काय कळतं? मी कंपाऊंडरकडून औषधं घेतो'- संजय राऊत
7 / 19
उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवर दिसले- राज ठाकरे
8 / 19
राज्य चालवणे हे येडागबाळ्याचे काम नव्हे; येत्या दोन महिन्यांत भाजपचे सरकार सत्तेत येईल- रावसाहेब दानवे
9 / 19
महाराष्ट्राला ड्रायव्हर नकोय, चांगला मुख्यमंत्री हवाय. उद्धव ठाकरे हे खेळण्यातले मुख्यमंत्री- नारायण राणे
10 / 19
कुणी जास्त अंगावर आलं तर हात धुवून मागे लागेन- उद्धव ठाकरे
11 / 19
कंगना राणौत नॉटी गर्ल, हरामखोर मुलगी - संजय राऊत
12 / 19
पार्थ पवार इममॅच्युअर, त्यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही- शरद पवार
13 / 19
'माझ्या भाषणात जो अडचणी आणतो, आडकाठी आणतो तो पुन्हा निवडून येत नाही'- सुधीर मुनगंटीवार अजित पवारांचं क्षणार्धात प्रत्युत्तर...'तुमचं आव्हान स्वीकारलं, मला पुढच्या वेळेस पाडून दाखवा'
14 / 19
कोल्हापुरातून आजही जिंकेन, हरल्यास हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील
15 / 19
आरेमधून कांजूरला मेट्रो कारशेड नेणं हा फक्त सरकारचा इगो; इच्छा तिथे मार्ग, टाईमपास तिथे कांजूरमार्गः देवेंद्र फडणवीस
16 / 19
महाविकास आघाडी सरकार बैलासारखं; टोचल्याशिवाय पुढेच जात नाही- नितीन गडकरी
17 / 19
दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागले- एकनाथ खडसे
18 / 19
तुम्ही हे राज्य २५ वर्षे चालवा किंवा २७ वर्षे चालवा. पण हे कायद्याने चालवाः देवेंद्र फडणवीस
19 / 19
त्यांनी (भाजप) माझ्या मागे 'ईडी' लावली, तर मी 'सीडी' लावेन- एकनाथ खडसे
टॅग्स :flashback 2020फ्लॅशबॅक २०२०Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारeknath khadseएकनाथ खडसेNarayan Raneनारायण राणे raosaheb danveरावसाहेब दानवेKangana Ranautकंगना राणौतPoliticsराजकारण