PHOTOS: लग्नाच्या रोमान्सनंतर थेट टेनिस कोर्टवर... ४५ वर्षांची व्हीनस विल्यम्स रचणार इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:28 IST2026-01-02T15:53:20+5:302026-01-02T16:28:24+5:30

Venus Williams Tennis History: व्हीनस व्हिल्यम्सने डॅनिश मॉडेल-अभिनेता आंद्रिया प्रेटीशी लग्न केले.

अमेरिकन टेनिस दिग्गज व्हीनस विल्यम्स इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. ४५ वर्षांची असताना तिला ऑस्ट्रेलियन ओपनसाठी वाइल्डकार्ड मिळाले आहे.

तिने या वर्षीच्या पहिल्या ग्रँड स्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणारी सर्वात वयस्कर महिला खेळाडू होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

यापूर्वी, हा विक्रम २०१५ मध्ये जपानच्या ४४ वर्षीय किमिको डेटच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियन ओपन १८ जानेवारीपासून सुरू होत आहे. यामुळे व्हीनस २८ वर्षांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये परतली आहे.

२०२१ पासून ती मेलबर्नमध्ये खेळलेली नाही आणि २०२३ पासून उत्तर अमेरिकेबाहेर कोणत्याही स्पर्धांमध्ये सहभागी झालेली नाही, कारण आरोग्याच्या समस्यांमुळे तिच्या कारकिर्दीवर परिणाम झाला होता.

अलीकडेच व्हीनसने डॅनिश मॉडेल आणि अभिनेता आंद्रिया प्रेटशी लग्न केले. त्यांनी पहिले लग्न सप्टेंबरमध्ये इटलीमध्ये केले होते. आता औपचारिकतेमुळे, आता डिसेंबरमध्ये फ्लोरिडामध्ये त्यांनी दुसरे लग्न झाले.

त्यांनी सहा दिवसांच्या लक्झरी डिनर आणि पार्टीचा आनंद घेतला, ज्यामध्ये त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंब उपस्थित होते.

व्हीनसने व्होगला सांगितले की सेरेनाने तिला एक यॉट भेट दिली होती, ज्यावर कुटुंब आणि मित्रांनी त्यांचे लग्न साजरे केले.

व्हीनसने कारकिर्दीत टेनिस कोर्टवर अनेक चांगले क्षण साजरे केले. १९९८ मध्ये, तिने तिची बहीण सेरेनाविरुद्ध ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दमदार पदार्पण केले होते.

तिने बहिणीसोबत ३१ वेळा कोर्ट शेअर केले आहे. २००३ आणि २०१७ च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत दोन्ही बहिणी आमनेसामने आल्या होत्या, ज्यामध्ये सेरेना विजयी ठरली.

गेल्या वर्षी व्हीनसने ११ व्या मानांकित कॅरोलिना मुचोवाला यूएस ओपनमध्ये कठीण लढत दिली होती. पण ती अंतिम सेटमध्ये पराभूत झाली.

गर्भाशयाच्या फायब्रॉइड्सच्या शस्त्रक्रियेनंतर जवळजवळ एक वर्षानंतर जुलैमध्ये तिने केलेल्या WTA टूरमध्ये हे तिचे पुनरागमन होते.