Tokyo Olympic : छोटा पॅकेट, बडा धमाका!; 13 वर्षांच्या निशियानं जिंकलं ऑलिम्पिक सुवर्ण; रौप्य, कांस्य जिंकणाऱ्या खेळाडूंचेही वय बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 16:59 IST2021-07-26T16:56:51+5:302021-07-26T16:59:19+5:30

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सोमवारचा दिवस खास राहिला... ऐकिकडे 57 वर्षांच्या नेमबाजानं कांस्यपदक जिंकून यंदाच्या स्पर्धेतील वयस्कर पदकविजेत्याचा मान पटकावला, तर दुसरीकडे 13 वर्षांच्या पोरींनी कमाल केली.

ऑलिम्पिक स्पर्धेत प्रथमच सहभागी करण्यात आलेल्या स्केटबोर्डिंग क्रीडा प्रकारात जपानच्या मोमीजी निशिया हिनं सुवर्णपदकाची कमाई केली. ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात कमी वयाच्या वैयक्तिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये तिनं नाव नोंदवलं.

13 वर्षे व 330 दिवसांच्या निशियानं स्केटबोर्डिंगचं सुवर्णपद नावावर केले. ब्राझीलच्या रेसा लीलनं रौप्यपदक जिंकले आणि तिचे वय हे १३ वर्षे २०३ दिवस आहे.

निशियाने ट्रिक्स विभागात उल्लेखनीय कामगिरी करत 15.26 गुणांची कमाई केली. जपानच्या फुना नाकायामा हिनं कांस्य जिंकले अन् ती 16 वर्षांची आहे.

ऑलिम्पिकमध्ये सर्वात कमी वयात सुवर्ण पदक जिंकण्याचा विक्रम अमेरकिन डायव्हर मार्जरी गेस्ट्रिंगच्या नावावर आहे. तिने १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये १३ वर्षे आणि २६८ दिवसांच्या वयात सुवर्ण जिंकले होते.