Wimbledon 2025 Final :गोल्डन बॉय नीरज चोप्रासह या भारतीय सेलिब्रिटींची दिसली खास झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 23:15 IST2025-07-13T22:40:05+5:302025-07-13T23:15:48+5:30
इथं पाहा गोल्डन बॉयसह विम्बल्डन फायनलसाठी हजेरी लावलेल्या भारतीय लोकप्रिय चेहऱ्यांचे खास फोटो

विम्बल्डन २०२५ स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या जेतेपदासाठी इटालियन यानिक सिनर आणि गत चॅम्पियन स्पॅनिश स्टार कार्लोस अल्काराझ यांच्यात जेतेपदासाठी लढत रंगल्याचे पाहायला मिळाले.
मागील दोन वर्षे विम्बल्डन स्पर्धेत अधिराज्य गाजवणाला कार्लोस अल्काराझ आणि टेनिस जगतातील अग्रमानांकित यानिक सिनर यांच्यात ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर रंगलेली फायनल लढत पाहण्यासाठी अनेक भारतीय लोकप्रिय चेहऱ्यांनीही हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
भारताचा दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्रा हा देखील सुटा बुटात विम्बल्डन फायनल पाहण्यासाठी पोहचल्याचे पाहायला मिळाले.
विम्बल्डनच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून नीरज चोप्राची विम्बल्डन लूकची खास झलक दाखवणारा फोटो शेअर करण्यात आला आहे.
स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत गोल्डन बॉय नीरज चोप्रानं पहिल्यांदाच टेनिस ग्रँडस्लॅमचा आनंद घेण्यासाठी हजेरी लावल्याची गोष्टही शेअर केली.
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हा आवडता टेनिस स्टार असून अल्कराझ आणि सिनर यांच्यातील तगटी फाईट बघायला मिळेल, असेही तो म्हणाला.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने देखील विम्बल्डनच्या फायनलला हजेरी लावली. फायनलमध्ये अल्काराझ जिंकेल, असे मत तिने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
विम्बल्डनच्या फायनल पाहण्यासाठी IPL मधील पंजाब किंग्ज संघाची मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटानेही हजेरी लावली होती.