गुलालाची उधळण अन् हाती भगवा झेंडा… मराठ्यांचा एकच जल्लोष! पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 12:08 PM2024-01-27T12:08:33+5:302024-01-27T12:17:39+5:30

मराठा आंदोलकांनी रस्त्यावर येऊन, नाचून, गुलाल उधळत आनंद साजरा केला.

नवी मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मागण्या मान्य झाल्यानंतर राज्यभरात मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. मराठा आरक्षण आंदोलनाचा विजय झाल्यानंतर नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भव्य सभा पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं ऐतिहासिक भाषण झालं. या विजयी मेळाव्यातील त्यांचे विचार ऐकण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित मराठा आंदोलकांनी रस्त्यावर येऊन, नाचून, गुलाल उधळत आनंद साजरा केला. (सर्व फोटो - संदेश रेणोसे)