जन्मदिवस: संन्यासी ते CM, असा आहे योगी आदित्यनाथांचा प्रवास; सलग पाच वेळा झाले आहेत खासदार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 01:04 PM2021-06-05T13:04:49+5:302021-06-05T13:18:21+5:30

2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. यानंतर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आणि 19 मार्च 2017 रोजी त्यांनी उत्‍तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री म्हणून शपथ घेतली. (CM Yogi Adityanath)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज 49वा जन्मदिवस. गोरक्षपीठाचे महंत योगी आदित्यनाथ सलग पाच वेळा खासदार राहिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे खरे नाव अजय सिंह बिष्‍ट असे आहे. मात्र, नाथ पंथाची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलले. (Yogi Adityanath 49th birthday know about political journey of utter pradesh cm)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा जन्म 5 जून 1972 रोजी उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गावात झाला होता. योगींच्या वडिलांचे नाव आनन्‍द सिंह बिष्‍ट आणि आईचे नाव सावित्री देवी.

योगी आदित्यनाथ हे एकूण सात-भाऊ-बहीण आहेत. योगी आदित्यनाथ हे पाचव्या क्रमांकाचे आहेत. मात्र 22 वर्षांचे असतानाच ते योगी झाले.

''गणितात मास्टर आहेत योगी आदित्यनाथ'' - गढवाल विद्यापीठातून गणितात बीएससी केल्यानंतर 1993 मध्ये ते एमएससी मॅथ्स झाले आहेत. याचदरम्यान ते गोरखपूर येथे पोहोचले. 15 फेब्रुवारी 1994 मध्ये त्यांनी गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ यांच्याकडून दीक्षा घेऊन घर सोडले. आणि योगी झाले.

महंत अवैद्यनाथ यांनी योगी आदित्यनाथांना 1998 मध्ये आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. एवढेच नाही, तर त्यांनी योगी आदित्तयनाथांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणूनही घोषित केले होते.

यानंतर झालेल्या निवडणुकीत ते केवळ 26व्या वर्षीच खासदार झाले होते. पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या योगी आदित्यनाथांना सर्वात कमी वयात खासदार होण्याचा मान मिळाला आहे.

'अनेक वादांचा सामना' - मुख्यमंत्री होण्यापूर्वी योगी आदित्यनाथ नेहमीच वादांमुळे चर्चेत असत. मात्र, 10 फेब्रुवारी 1999 मध्ये महाराजगंज जिल्ह्यातील पचरुखिया कांडानंतर योगी अधिकच चर्चेत आले होते.

या कांडानंतरच त्यांच्यावर अनेक वेळा एक धर्माचे विरोधक आणि सांम्प्रदायिक भाषण देण्याचा आरोप केला गेला. गोरखपूरमध्ये झालेल्या धार्मिक दंगलीच्या वेळी त्यांना कारागृहातही जावे लागले होते.

सलग पाच वेळा जिंकली लोकसभा निवडणूक - यादरम्यान योगी आदित्यनाथांनी हिंदू युवा वाहिनी आणि बजरंग दल सारख्या संघटनांना बळकट केले. योगी आदित्यनाथांनी हिंदुत्व आणि विकासाचा झेंडा हाती घेतला. 2007च्या विधानसभा निवडणुकीत आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांचे बंडखोरीचे अवसानही बघायला मिळाले.

योगी आदीत्यनाथांनी 1998, 99, 2004, 2009 आणि 2014 साली लोकसभा निवडणूक जिंकली. 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. यानंतर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले आणि 19 मार्च 2017 रोजी त्यांनी उत्‍तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...