शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भयंकर! 'या' ठिकाणी Black Fungus चे थैमान, 32 जणांचा मृत्यू; 30 जणांचे काढावे लागले डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 3:49 PM

1 / 15
कोरोनामुळे लोकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोना रुग्णांना एका नव्या आजाराचा सामना करावा लागत आहे.
2 / 15
धक्कादायक बाब म्हणजे योग्य वेळी जर यावर उपचार झाले नाहीत तर रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत. 'म्यूकोरमायसिस' असं या आजाराचं नाव असून कोरोना रुग्णांमध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.
3 / 15
'म्यूकोरमायसिस' हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. उत्तर प्रदेशातील वाराणसीत ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे.
4 / 15
वाराणसीत ब्लॅक फंगसमुळे गेल्या 24 तासांत आठ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत ब्लॅक फंगसमुळे 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भयंकर प्रकार म्हणजे ऑपरेशन करून 30 रुग्णांचे डोळे काढावे लागले आहेत.
5 / 15
ब्लॅक फंगसच्या रुग्णांची एकूण संख्या ही आता 145 वर पोहोचली आहे. बीएचयूच्या सर सुंदर लाल रुग्णालयात खास दोन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 80 बेड असून ते आता फुल झाले आहेत.
6 / 15
बीएचयू सर सुंदरलाल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. के के गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक फंगसच्या रुग्णांसाठी रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत. तसेच रुग्णांना सर्व सुविधा दिल्या जातील असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
7 / 15
देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशात कहर पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत.
8 / 15
काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत.
9 / 15
उत्तर प्रदेशची राजधानी असणाऱ्या लखनऊमध्ये एक धडकी भरवणारा प्रकार समोर आला आहे. एकाच रुग्णाला तीन प्रकारच्या फंगसचा संसर्ग झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. म्हणजेच व्हाइट फंगस, ब्लॅक फंगस आणि यल्लो फंगस अशा तिन्ही प्रकारच्या फंगचा एकाच वेळी संसर्ग झाला आहे.
10 / 15
डॉक्टरांनी या रुग्णावर तीन तास शस्त्रक्रिया केली आहे. शस्त्रक्रीयेनंतर या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार फैजाबाद येथे राहणारे सरस्वती यादव यांना महिन्याभरापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता.
11 / 15
यादव यांनी कोरोनावर मात केली मात्र यानंतर त्यांना चेहऱ्याजवळ वेदना होत असल्याने त्यांनी लखनऊमधील राजधानी रुग्णालयामध्ये उपचार घेतले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर या रुग्णाला फंगसचा संसर्ग झाल्याचं समोर आलं.
12 / 15
डॉक्टरांनी इतरही चाचण्या केल्या आणि त्यामध्ये समोर आलेल्या रिपोर्टमधून रुग्णाला एकाच वेळी तिन्ही प्रकारच्या फंगसचा संसर्ग झाल्याचं उघड झालं. त्यानंतर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. तीन तास चाललेल्या सर्जरीनंतर या रुग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.
13 / 15
कोरोनावर मात केल्यानंतर एकाच रुग्णाला तिन्ही प्रकारच्या फंगसचा संसर्ग होण्याचं हे दुसरं प्रकरण आहे. याआधी गाझियाबादमधील एका रुग्णाला तिन्ही प्रकारच्या फंगसचा संसर्ग झाला होता. मात्र या रुग्णाला आधी कोरोना झालेला नव्हता.
14 / 15
राजधानी रुग्णालयातील डोकं आणि मानेची शस्त्रक्रिया करणाऱ्या विभागातील डॉक्टर अनुराग यांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजाबादमधील या रुग्णाला पोस्ट कोविड लक्षणं दिसून येत होती.
15 / 15
रुग्णाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर तिन्ही प्रकारच्या फंगसची लागण झाल्याचं समोर आलं. कोरोना संसर्गाची लाट आलेली असतानाच देशामध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMucormycosisम्युकोरमायकोसिसIndiaभारतVaranasiवाराणसीDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर