केदारनाथमध्ये भारतीय हवाई दलाच्या M17 हेलिकॉप्टरचा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 14:50 IST2018-04-03T14:50:26+5:302018-04-03T14:50:26+5:30

भारतीय हवाई दलाचं एम-17 हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त

हेलिकॉप्टरमधील पायलटसह पाच जणांना किरकोळ दुखापत झाली असून ते सर्व सुखरूप आहेत.

अपघातात हेलिकॉप्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

हेलिपॅडवर उतरत असताना लोखंडी गर्डरसह टक्कर झाल्याने हा अपघात झाला त्यानंतर हेलिकॉप्टरच्या मागच्या बाजूला आग लागली होती.

अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.