चिंता वाढली! ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन 30 ते 100 टक्के अधिक घातक; रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 11:52 AM2021-03-13T11:52:44+5:302021-03-13T12:01:32+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे कित्येक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील रुग्णांची संख्या तब्बल एक कोटींवर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देशांत कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

कोरोनामुळे कित्येक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील रुग्णांची संख्या तब्बल एक कोटींवर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत.

कोरोनावर जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. रिसर्चमधून पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक घातक असल्याचं रिसर्चमधून समोर आलं आहे.

ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन हा सर्व जुन्या स्ट्रेनपेक्षा अधिक खतरनाक आहे. रिसर्चनुसार, हा व्हायरस खूपच घातक आहे. ब्रिटनमध्ये सापडलेला नवा स्ट्रेन हा कोरोनाच्या इतर स्ट्रेनपेक्षा 30 ते 100 टक्के अधिक धोकादायक आहे.

युकेच्या ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला असून याबाबतची आकडेवारी देण्यात आली आहे. ब्रिटन कोरोना स्ट्रेन आढळून आलेल्या 54906 पैकी 227 जणांचा मृत्यू झाला आहे.

नव्या स्ट्रेनमुळे झालेल्या लोकांच्या मृत्यूचा दर आणि कोरोना व्हायरसमुळे झालेले मृत्यू यांची रिसर्चमध्ये तुलना करण्यात आली असून यामध्ये बरंच अंतर असल्याचं दिसून आलं आहे. तसेच तो अत्यंत धोकादायक आहे.

कोरोना व्हायरसचा ब्रिटिश व्हेरिएंट हा गेल्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा समोर आला. त्यानंतर हा नवा स्ट्रेन 100 हून अधिक देशांत पसरला. यामध्ये भारताचा देखील समावेश आहे. तसेच नव्या कोरोना व्हायरसच्या जेनेटिक कोडमध्ये 23 म्यूटेशन्स पाहायला मिळत आहे.

म्यूटेशन्सची संख्या ही जास्त असल्याने या कोरोना व्हायरसचा प्रसार हा इतरांच्या तुलनेत अधिक वेगाने हेक आहे. नवा कोरोना हा जुन्या व्हायरसपेक्षा 40 ते 70 टक्के अधिक वेगाने पसरत आहे.

कोरोनाच्या या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. कोरोनाचा वेग वाढताना दिसून येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. गेल्या वर्षी 11 मार्च रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाला महामारी म्हणून घोषित केलं होतं.

कोरोनाचा वेग थोडा मंदावत असतानाच आता पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे देशातील परिस्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे.

देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 24,882 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 140 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,13,33,728 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,58,446 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतामध्ये जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंगसारखे खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तामिलनाडू, गुजरात आणि कर्नाटकमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.