भारतीयांनी २०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केलेले टॉप १० सेलिब्रिटी कोण? पहा संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 15:27 IST2024-12-11T15:11:01+5:302024-12-11T15:27:24+5:30
India's Most Searched Person In 2024: गुगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या भारतीयांच्या यादीत या वर्षी खेळाडूंचे वर्चस्व होते. या यादीत ना कोणी राजकारणी, ना कोणी चित्रपट स्टार किंवा कोणी उद्योगपती पहिल्या क्रमांकावर नाही. पहिल्या दहामध्ये पाच खेळाडूंचा समावेश आहे.

भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे. बॅडमिंटनमधील आपल्या अप्रतिम कामगिरीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले.
सनरायझर्स हैदराबादचा तरुण क्रिकेटपटू अभिषेक शर्मा या यादीत नवव्या स्थानी आहे. अभिषेक शर्माने २८ चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला होता.
अनेक दिग्गज बॉलीवूड स्टार्सना मागे टाकत अंबानी कुटुंबाची धाकटी सून राधिका मर्चंटने या यादीत आठवं स्थान मिळवलं आहे.
बोल्ड स्टाइलमुळे आणि वादांमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री पूनम पांडे या यादीत सातव्या स्थानावर आहे. काही महिन्यांपूर्वी पूनम पांडेचा मृत्यू झाल्याची अफवा मुद्दाहून पसरवण्यात आली होती.
पंजाब किंग्जचा तरुण फलंदाज शशांक सिंहसुद्धा यावर्षी गुगलवर चर्चेत होता. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले. गुगलवर सर्वाधिक सर्च होणाऱ्या व्यक्तींच्या यादीत सहावं स्थानही पटकावलं आहे.
अभिनेत्यावरुन राजकारणी बनलेले पवन कल्याण यावर्षी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या यशाचा गुगलवर खूप शोध घेण्यात आला.
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या त्याच्या कामगिरीमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यासाठी, विशेषत: घटस्फोटामुळे चर्चेत राहिला. टी20 विश्वचषकात चमकदार कामगिरी करून तो प्रसिद्धीच्या झोतात राहिला.
चित्रपटांमधून राजकारणात आलेल्या चिराग पासवान यांनी मोदी सरकारमध्ये मंत्री बनून या वर्षी नवी ओळख निर्माण केली. त्यांच्या राजकीय यशाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच, त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांच्याशी ताणलेल्या संबंधांमुळे त्यांना गुगलवर सर्च करण्यात येत होतं.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या राजकीय निर्णयांमुळे आणि युतीमुळे लोकप्रियता मिळवली. त्यांचे राजकीय कौशल्य आणि रणनीतीमुळे ते गुगलवर चर्चेचा विषय बनले.
कुस्तीपटू विनेश फोगट हिने २०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइलच्या अंतिम फेरीत केवळ १०० ग्रॅम वजनामुळे अपात्र ठरल्यानंतर ती चर्चेत आली. हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली आणि आमदारही बनली.