हे आहेत जगातील सर्वात महागडे पदार्थ! यांची किंमत आहे सोन्या चांदीपेक्षाही जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 03:39 PM2018-12-31T15:39:27+5:302018-12-31T16:12:30+5:30

महागडे पदार्थ किंवा धातू म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर येतात ते सोने, चांदी यासारखे महागडे धातू. मात्र या जगात सोने आणि चांदीहून महाग असे अनेक पदार्थ आहेत. त्यापैकी काही पदार्थांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

हेरॉइन (ड्रग्ज) - हेरॉइन या अमली पदार्थ खूप महाग असून, सध्या बाजारामध्ये एक ग्रॅम हेरॉइनची किंमत नऊ हजार रुपये इतकी आहे.

कोकेन - कोकेन हा अमली पदार्थसुद्धा भरपूर महाग असून, सध्या एक ग्रॅम कोकेनसाठी सुमारे 15 हजार रुपये मोजावे लागतात.

एलएसडी - एलएसडीचा समावेशही महाग अशा अमली पदार्थामध्ये होतो. एक ग्रॅम एलएसडीची किंमत दोन लाख रुपयांपर्यंत असते.

प्लूटोनियम - प्लूटोनियम या किरणोत्सारी धातूची किंमत सुमारे 2 लाख 80 हजार रुपये प्रति ग्रॅम एवढे आहे.

पेनाइट - पेनाइट हे अत्यंत महाग असे रत्न आहे. त्याची किंमत सहा लाख 28 हजार प्रति ग्रॅम एवढी आहे.

टाफेट स्टोन - टाफेल स्टोन हेसुद्धा अत्यंत महागडे रत्न आहे. त्याचे मूल्य सुमारे 14 लाख रुपये प्रति ग्रॅम एवढे प्रचंड आहे.

ट्रीटियम -ट्रीटियम हा किरणोत्सारी पदार्थही अत्यंत महाग आहे. त्याची किंमत 21 लाख रुपये प्रति ग्रॅम एवढी आहे.

प्राचीन हिरे - अब्जावधी वर्षांपूर्वीच्या हिऱ्यांनाही दुर्मीळतेमुळे मोठी किंमत मिळते. अशा हिऱ्यांसाठी सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे 38 लाख 39 हजारांपर्यंत किंमत मिळते.

कॅलिफोर्नियम - कॅलिफोर्नियम हा किरणोत्सारी पदार्थही प्रचंड महाग असून, त्याचे मूल्य 1 कोटी 88 लाख रुपये प्रति ग्रॅम एवढे आहे.

अँटिमॅटर - अंतराळातून शोधण्यात आलेले पदार्थ ज्यांना अँटिमॅटर म्हटले जाते असे पदार्थ प्रचंड महाग असतात. साधारणपणे 4 कोटी 36 लाख रुपये प्रति ग्रॅम एवढी त्यांची किंमत असते.