या आहेत भारतातील टॉपच्या उद्योगपतींच्या पत्नी, सौंदर्यामध्ये करतात अभिनेत्रींशी स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 11:02 PM2022-08-16T23:02:13+5:302022-08-16T23:05:18+5:30

businessmen Wife: देशातील अनेक उद्योगपतींनी आपली खास अशी ओळख निर्माण केली आहे. अनेकांनी छोट्या स्टार्टअप्सपासून सुरुवात करत आपलं बिझनेसचं साम्राज्य उभं केलं आहे. यापैकी अनेक उद्योगपतींच्या यशामध्ये त्यांच्या पत्नींचा मोलाचा वाटा आहे. आज आपण अशाच काही उद्योगपतींबाबत जाणून घेऊयात.

देशातील अनेक उद्योगपतींनी आपली खास अशी ओळख निर्माण केली आहे. अनेकांनी छोट्या स्टार्टअप्सपासून सुरुवात करत आपलं बिझनेसचं साम्राज्य उभं केलं आहे. यापैकी अनेक उद्योगपतींच्या यशामध्ये त्यांच्या पत्नींचा मोलाचा वाटा आहे. आज आपण अशाच काही उद्योगपतींबाबत जाणून घेऊयात.

झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांच्या पत्नीचं नाव कंचन गोयल आहे. त्यांची ओळख आयआयटी दिल्लमध्ये झाली होती. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये गणिताच्या प्राध्यापिका असलेल्या कंचन प्रकाशझोतापासून दूर राहतात. त्यांनी २००७ मध्ये विवाह केला होता. त्यांना एक मुलगी आहे.

फ्लिपकार्टचे को-फाऊंडर सचिन बन्सल यांच्या पत्नीचं नाव प्रिया बन्सल आहे. पेशाने डेंटिस्ट असलेल्या प्रिया यांचं बंगळुरूतील कोरमंगला येथे एक क्लीनिक आहे. सुमारे ५४०० कोटींचे मालक असलेले सचिन बन्सल आणि त्यांच्या पत्नी एकमेकांसोबत फारच कमी वेळ व्यतीत करतात.

हाऊसिंग डॉट कॉमचे को फाऊंडर आणि माजी सीईओ राहुल यादव यांनी करिश्मा कोखर हिच्याशी विवाह केला. करिश्मा ह्या इंजिनियरिंगमध्ये पदवीधर आहेत.

स्नॅपडीलचे को-फाऊंडर कुणाल बहल यांची पत्नी याशना दीश या पदवीधर आहेत. त्यांनी कँडी फ्लॉसचा व्यवसाय सुरू केला होता. कुणाल आणि याशना यांनी २०१२ मध्ये विवाह केला होता. त्यांना एक मुलगी आहे.

अॅप बेस्ड टॅक्सी सेवा देणारी कंपनी ओलाचे को-फाऊंडर भाविश अग्रवाल यांनी राजलक्ष्मी अग्रवाल हिच्याशी विवाह केला होता.

मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी बॉलिवूड अभिनेत्री आसिन हिच्याशी २३ जानेवारी २०१६ मध्ये विवाह केला होता. दक्षिण भारतीय चित्रपटातून सुरुवात करणाऱ्या आसिनने गझनी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. होते. मात्र विवाहानंतर ती बॉलीवूडपासून दूर आहे.