सुपरस्टार दिलीप कुमार यांना जेआरडी टाटांनी ओळखलच नाही, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 09:51 AM2021-05-29T09:51:19+5:302021-05-29T10:09:16+5:30

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार सध्या आत्मचरित्र पुस्तकामुळे चर्चेत आहेत. दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक मजेदार किस्से आहेत, जे ऐकून जीवन सहज-सोप होईल.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार सध्या आत्मचरित्र पुस्तकामुळे चर्चेत आहेत. दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रामध्ये अनेक मजेदार किस्से आहेत, जे ऐकून जीवन सहज-सोप होईल.

दिलीप कुमार यांच्या आयुष्यातील हे किस्से ऐकल्यानंतर अनेकांना वाटेल की, अभिनेता दिलीप कुमार आपल्यातीलच आहेत, तुम्हाला सहजच त्यांच्यात आपलेपणा दिसेल.

दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात जेआरडी टाटांसदर्भातील असाच एक किस्सा सांगण्यात आलाय. जेआरडी टाटा आणि दिलीप कुमार यांच्या पहिल्या भेटीचा तो किस्सा आहे.

मी अभिनय क्षेत्रातील करिअरमध्ये उच्च स्थानावर होतो, तेव्हा एअर इंडियाच्या विमानातून मी प्रवास करत होतो. माझ्या शेजारी एक वयस्कर व्यक्ती बसली होती.

साधारण पँट आणि शर्ट परिधान केलेल्या या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर ते सर्वसामान्य मध्यम कुटुंबातील, पण उच्चशिक्षित असतील, असेच वाटायचे.

विमानातील इतर प्रवाशांनी मला ओळखलं होतं, मात्र, या व्यक्तीने मला नीट पाहिलंच नसल्याने ओळखलंही नाही. ते, पेपर वाचत आणि खिडकीतून बाहेर पहात.

एअर होस्टेसने चहा आणल्यानंतर अतिशय शांत अन् शिस्तबद्धतेनं त्यांनी चहा पिला. त्यावेळी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मी त्यांच्याकडे पाहून स्मीतहास्य केलं, त्यांनीही ते केलं.

आम्हा दोघांमध्ये चर्चा सुरू झाली, त्यावेळी चित्रपटाचा विषय निघाल्यानंतर मी त्यांना प्रश्न केला. आपण, चित्रपट पाहता का? त्यावर जेआरटी टाटांनी उत्तर दिले, हो. पण थोड्या प्रमाणात.

त्यानंतर, मी चित्रपटात काम करतो, असे त्यांना सांगितले. त्यांनीह व्वा छान म्हणत कौतुक केलं आणि आपण काय करता विचारले. त्यावर, दिलीप कुमार यांनी मी अभिनेता असल्याचं सांगितलं.

दिलीप कुमार आणि जेआरटी टाटा यांच्यातील संवाद झाल्यानंतर ते फ्लाईटमधून उतरताना त्यांनी हस्तांदोलन केले. त्यावेळी, मी दिलीप कुमार असं अभिनेत्यानं नाव सांगितलं.

दिलीप कुमार यांच्याशी हस्तांदोलन करताना, मी जेआरडी टाटा, असं नाव त्या ग्रहस्थाने सांगताच दिलीप कुमार अवाक झाले. जेआरटी यांनी मोठी शिकवण मला त्या प्रवासात दिल्याचं कुमार यांनी लिहिलंय.

तुम्ही किती मोठे आहात याने काहीच फरक पडत नाही. कारण नेहमीच आपल्यापेक्षात मोठा कुणीतरी असतोच, म्हणून नेहमीच विनम्र राहावा... असे दिलीप कुमार यांनी पुस्तकात लिहिलंय.

Read in English