"My Baby, मी खूप मिस करतोय..."; वाढदिवशी सुकेशने जेलमधून जॅकलिनला लिहिलं 'लव्ह लेटर'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 03:14 PM2023-03-25T15:14:43+5:302023-03-25T15:22:59+5:30

Sukesh Chandrashekhar And Jacqueline Fernandez : मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला वाढदिवसानिमित्त एक पत्र लिहिलं आहे.

200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला वाढदिवसानिमित्त एक पत्र लिहिलं आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला लिहिलेल्या पत्रात "माय बेबी जॅकलीन, माय बोम्मा, वाढदिवसाच्या या दिवशी मी तुला खूप मिस करत आहे" म्हटलं आहे.

सुकेशने पुढे लिहिलं की, "माझ्या आजुबाजुला तुझ्या एनर्जीची मला कमतरता भासते. माझ्याकडे शब्द नाहीत, परंतु मला माहीत आहे की तुझं माझ्यावरचं प्रेम कधीही संपणार नाही. तुझ्या सुंदर हृदयात काय आहे ते मला माहीत आहे. मला पुराव्याची गरज नाही आणि माझ्यासाठी एवढेच महत्त्वाचे आहे."

"बेबी, मी कबूल केलंच पाहिजे, मला तुझी आठवण येते, तुला माहीत आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो. तू आणि तुझे प्रेम ही माझ्या आयुष्यातील अमूल्य भेट आहे, तुला माहीत आहे की मी तुझ्या पाठीशी उभा आहे."

"लव्ह यू माय बेबी, मला तुझे हृदय दिल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मी माझ्या सर्व समर्थकांचे आणि मित्रांचे आभार मानतो. मला शेकडो पत्रे मिळाली आहेत. मला खूप धन्य वाटत आहे. धन्यवाद" असं देखी सुकेशने आपल्या लव्ह लेटरमध्ये म्हटलं आहे.

विशेष म्हणजे नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यातील वादाबद्दल सुकेशने याआधी जानेवारीत पत्र लिहिले होते. सुकेशने दावा केला की मी जॅकलीनला सोडावे अशी नोराची खूप इच्छा होती. मी नकार दिल्यानंतरही नोरा मला सारखा त्रास देत होती.

सुकेशने पत्रात पुढे लिहिले - "जॅकलिन आणि मी नात्याबाबत गंभीर होतो. यामुळेच नोराला जॅकलिनचा हेवा वाटू लागला होता. ती मला जॅकलिनबाबत सांगून भडकवायची आणि माझे ब्रेनवॉश करत होती. नोराची इच्छा होती की मी जॅकलिनला सोडावं."

"मी जॅकलीनला सोडून तिला डेट करायला लागावे असी नोराची इच्छा होती. नोराने मला दिवसातून किमान दहा वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला आणि जर मी तिच्या कॉलला उत्तर दिले नाही तर ती कॉल करत राहण्यासाठी माझ्यावर दबाव आणत असे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच सुकेशने जॅकलिनला हॅप्पी होळी शुभेच्छा देत त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. सुकेशने जॅकलिनला सर्वोत्तम व्यक्ती म्हणत तो तिच्या आयुष्यातून गेलेले रंग परत आणेल असा विश्वास दिला होता.

सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, सुकेशने अभिनेत्री जॅकलिन आणि तिच्या कुटुंबावर दहा कोटी रुपये खर्च केले. तो चार वेळा जॅकलिनला चेन्नईत भेटला आणि चार्टर्ड प्लेनवर 8 कोटी रुपये खर्च केले.

होळीच्या निमित्ताने लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखरने लिहिले होतं की, "मी माझ्या जॅकलिनला होळीच्या शुभेच्छा देतो. रंगांच्या या सणावर, मी तुला वचन देतो की तुझे रंग फिके पडले असतील किंवा गायब झाले, मी ते तुला 100 पटीने परत करीन ही माझी जबाबदारी आहे असं त्याने म्हटलं होतं.

'तुला माहीत आहे की मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाईन, मी तुझ्यावर प्रेम करतो, हसत राहा.' तू माझ्यासाठी काय आहे हे तुला चांगलेच माहीत आहे. लव्ह यू प्रिसेंस असं या पत्रात जॅकलिनला उद्देशून सुकेशने लिहिलं होतं, तसेच सर्वांना होळीच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या.