Bhagat Singh:पाकिस्तानात आहे 'शहीद-ए-आझम' भगतसिंग यांचे वडिलोपार्जित घर, कशी आहे घराची अवस्था..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:08 PM2022-03-23T12:08:32+5:302022-03-23T12:21:40+5:30

Bhagat Singh: आजच्याच दिवशी, 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती.

Bhagat Singh: जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची चर्चा होते, तेव्हा प्रत्येकाच्या मनात 'शहीद-ए-आझम' भगतसिंग(Bhagat Singh) यांचे नाव येते. स्वातंत्र्यासाठी लढताना अवघ्या 23व्या वर्षी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.

आजच्याच दिवशी, 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. या तीन महान क्रांतीकारकांच्या स्मरणार्थ आजच्या दिवसाला शहीद(Shaheed Diwas) दिवस म्हटले जाते.

भगतसिंग यांचे चाहते फक्त भारतातच नाही तर सीमेपलीकडील पाकिस्तानातही आहेत. त्यांचे वडिलोपार्जित घर आजही पाकिस्तानात आहे. याच घरात शहीद-ए-आझम यांचा जन्म झाला होता.

पंजाब प्रांतातील खटकरकलान गावात असलेल्या या वाड्यात भगतसिंग यांचे बालपण गेले. फागवाडा-रोपर राष्ट्रीय महामार्गावरील बांगाच्या उपविभागापासून तीन किलोमीटर अंतरावर वडिलोपार्जित खटकरकलान गाव आहे.

पुरातत्व व सांस्कृतीक विभागाने घराच्या दुरुस्तीचे काम केले असून त्याची देखभालही केली जाते. देशाची फाळणी झाली तेव्हा त्यांची आई विद्यावती आणि वडील किशन सिंह येते राहू लागले.

किशनसिंग यांचे येथेच निधन झाले आणि भगतसिंग यांच्या आईनेही 1975 साली जगाचा निरोप घेतला. हे घर नंतर संग्रहालय म्हणून विकसित करण्यात आले.

घरात एक पलंग आहे. एका खोलीत लाकडाची दोन कपाटे आहेत, तर शेतीशी संबंधित काही वस्तूही आहेत. दुसऱ्या खोलीत जेवणाचे टेबल आणि काही भांडी ठेवली आहेत.

भगतसिंग यांचे घर हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे जतन करुन पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

भगतसिंग मेमोरिअल फाऊंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमध्ये भगतसिंग यांच्याशी संबंधित आठवणी जतन करण्याचे काम करत आहे. भगतसिंग यांच्या आजोबांनी 124 वर्षांपूर्वी येथे आंब्याचे झाड लावले होते, जे आजही तिथेच आहे.