एकाच वेळी मुलगी होती चार बॉयफ्रेंड्सच्या संपर्कात, कळताच वडलांनी उचललं असं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 08:48 AM2021-03-12T08:48:45+5:302021-03-12T08:58:33+5:30

आजच्या काळात एका पेक्षा अधिक व्यक्तींशी संबंध असण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. (Abhayam 181 counseling girl with four boyfriend)

आजच्या काळात एका पेक्षा अधिक व्यक्तींशी संबंध असण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गुजरातमधील अहमदाबादमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

येथील एका २० वर्षीय मुलीच्या वडिलांना एका मुलाच्या माध्यमातून काही मेसेज, फोन रेकॉर्डिंग आणि चॅटिंगचे स्क्रीन शॉट्स मिळाले. त्यामधून त्यांची मुलगी ही एकाच वेळी चार जणांच्या संपर्कात असल्याचे त्यांना समजले. तसेच ज्या मुलाने ही माहिती दिली होती तोसुद्धा या मुलीचा एक बॉयफ्रेंड होता.

मुलीबाबतची ही माहिती कळल्यावर वडलांच्या पायाखालची वाळू सरकली. याबाबत ते कुणाशी बोलू शकत नव्हते. कारण त्यांना मुलीच्या भविष्याची चिंता होती. तसेच मुलीलाही ओरडू शकत नव्हते. कारण ती घर सोडून जाईल, अशी भीती होती. अखेर वडलांनी खूप विचार करून पोलिसांच्या समुपदेशन सेवेशी संपर्क करण्याचा निर्णय घेतला.

महिलांसाठीच्या अभयम नावाने चालणाऱ्या या समुपदेशन सेवेशी त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर या सेवेचे पथक त्यांच्या घरी आले. मात्र या मुलीने त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीला वडिलांच्या माध्यमातून मुलांसोबतच्या बोलण्याचे रेकॉर्ड दाखवले गेले. तेव्हा चार बॉयफ्रेंड्सच्या संपर्कात असल्याचे तिने मान्य केले.

त्यानंतर या सेवेतील महिला अधिकाऱ्यांनी या मुलीला विश्वासात घेऊन समजावले. तिच्या एका बॉयफ्रेंडशीही तिला बोलायला लावले. तो तरुण या मुलीसोबत बोलत असे. मात्र अन्य कुठल्या तरी मुलीसोबत विवाह करण्याच्या तयारीत होता. अखेर अभयम सेवेतील अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे तरुणीचे मनपरिवर्तन झाले. तसेच तिने या मुलांचे नंबर, फोटो आणि इतर रेकॉर्ड्स डिलीट करण्यास तयार झाली.

मुलीची समजूत काढल्यानंतर अभयम टीमने वडलांचेही समुपदेशन केले. तसेच मुलीसोबत या विषयावर न बोलण्याचे तसेच यावरून कुठलीही टिप्पणी न करण्याचा सल्ला दिला.