या गोष्टी वाचल्यावर वाढेल भारताबाबतचा अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 16:22 IST2019-09-19T16:07:15+5:302019-09-19T16:22:19+5:30

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतामध्ये सुमारे सव्वाशे कोटींहून अधिक लोक राहतात. या देशाची अशी काही खास वैशिष्टे आहेत जी वाचल्यानंतर तुम्हाला आपल्या देशाचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.

शांतताप्रिय
शांतताप्रिय देश म्हणून भारताची जगभरात ओळख आहे. आतापर्यंतच्या इतिहासात या देशाने कधीही कुठल्याही देशावर स्वत:हून आक्रमण केलेले नाही.

बुद्धिबळ
बुद्धिबळाचा शोध भारतात लागला.

गणित
बिजगणितासारख्या विषयांचा सखोल अभ्यास भारतात झाला.

पूर्णांक
आकड्यांमधील पूर्णांक ही भारताने दिलेली देणगी आहे. इसवी सन पूर्व 100 वर्षांपूर्वी भारतात पूर्णांकाचा शोध लागला.

बांधकाम निर्मिती
ग्रॅनाइटच्या दगडाने बांधलेली जगातील पहिली इमारत म्हणून तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर ओळखले जाते.

साप-शिडी
साप-शिडी या लोकप्रिय खेळाचा शोध भारतात लागला होता.

जगातील सर्वात उंचावरील क्रिकेट मैदान हिमाचल प्रदेशमधील चैल येथे आहे.

पोस्ट ऑफीस
जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफीस भारतामध्ये आहेत.

तक्षक्षिला
जगातील पहिले विद्यापीठ भारतातील तक्षक्षिला येथ इसवी सन पूर्व 700 वर्षांपूर्वी स्थापन झाले होते.

सर्वधर्मसमभाव
भारत हा एक सहिष्णू देश आहे. त्यामुळे या देशातील भूमीवर अनेक धर्म गुण्या गोविंदाने नांदतात.

















