फाशीची शिक्षा झालेल्या माजी नौसैनिकांची सुटका कशी झाली? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे इनसाइड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 01:29 PM2024-02-12T13:29:23+5:302024-02-12T13:43:09+5:30

Qatar Release Eight Indian Nationals: कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेले भारताचे ७ माजी नौदल अधिकारी आज पहाटे सुखरूपपणे भारतात परतले आहेत. या भारतीय नागरिकांची झालेली सुखरूप सुटका हे भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचे मोठे यश मानले जात आहे. आता या माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका कशी झाली? त्यासाठी पडद्यामागे काय घडामोडी घडल्या. याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेमागची रंजक इनसाइड स्टोरी पुढीलप्रमाणे आहे.

कतारमध्ये मृत्युदंडाची शिक्षा झालेले भारताचे ७ माजी नौदल अधिकारी आज पहाटे सुखरूपपणे भारतात परतले आहेत. या भारतीय नागरिकांची झालेली सुखरूप सुटका हे भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीचे मोठे यश मानले जात आहे. आता या माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका कशी झाली? त्यासाठी पडद्यामागे काय घडामोडी घडल्या. याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेमागची रंजक इनसाइड स्टोरी पुढीलप्रमाणे आहे.

या नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याची मुत्सद्देगिरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन कतारच्या अमीरांसोबत केलेली चर्चा निर्णायक ठरल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच लोकसभेमध्ये एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांनी कतारमध्ये अडकलेल्या माजी नौसैनिकांना परत आणून दाखावा, असं आव्हान केंद्र सरकारला दिलं होतं. मात्र पडद्यामागे या माजी अधिकाऱ्यांना परत आणण्यासाठी काय हालचाली सुरू होत्या आणि कतार अचानक या माजी अधिकाऱ्यांना परत पाठवेल याची कल्पनाही कुणी केली नव्हती.

ऑक्टोबर महिन्यात कतारमधील एका न्यायालयाने हेरगिरीच्या आरोपाखाली भारताच्या या ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासूनच या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. भारत आणि कतार यांच्यातील संबंध हे मैत्रिपूर्ण आहेत. तसेच दोन्ही देशांमधील व्यापारही मोठा आहे. दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हम्द अल-थानी यांची डिसेंबर महिन्यात दुबईमध्ये भेट झाली होती. या भेटीमध्ये मोदींनी या माजी नौदल अधिकाऱ्यांना सुनावलेल्या शिक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता.

दरम्यान,माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेपूर्वी मागच्याच आठवड्यात भारत आणि कतारमध्ये एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसार भारत कतारकडून एलपीजी खरेदी करणार आहे. हा करार पुढील २० वर्षांसाठी झाला आहे. तसेच या करारानुसार कतार भारताला दरवर्षी ७.५ दशलक्ष टन गॅस निर्यात करणार आहे. त्याच्या माध्यमातून भारत वीज, खत आणि सीएनजीची निर्मिती करणार आहे.

भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. कतारमधील भारताचे माजी राजदूत दीपक मित्तल यांनी तेथील सरकारसोबत शिक्षा शिथिल करण्यासाठी चर्चा करण्यास सुरुवात केली. कतारमध्ये भारताची बाजू मांडण्यात मित्तल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

एकीकडे सरकार कतारमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुत्सद्देगिरीमधून मार्ग काढत होतं. तर दुसरीकडे देशांतर्गत पातळीवरही सरकारचं काम सुरू होतं. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांशी सांवाद साधून सरकार या अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. तसेच नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार यांनीही सरकार या नौसैनिकांना सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते.