Ujjwala Yojana 2.0: मोफत गॅस कनेक्शन, सिलिंडर, शेगडीसाठी कसा अर्ज कराल? जाणून घ्या Ujjwala Yojana 2.0 योजनेबाबत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 12:20 PM2021-08-10T12:20:52+5:302021-08-10T12:30:50+5:30

PM Ujjwala Yojana: पंतप्रधान आज Ujjwala Yojana 2.0 लाँच करणार; जाणून घ्या मोफत गॅस कनेक्शन कसे मिळणार?

Pradhan Mantri Ujjwala Yojana 2.0: केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेच्या (Ujjwala Yojana 2.0) दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. या योजनेतून गरीबी रेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन (Free Gas Connection) दिले जाणार आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता. (free gas connection, cylinder: All you need to know about scheme)

या योजनेनुसार मोफत कनेक्शन देताना पहिला सिलिंडर मोफत आणि गॅस शेगडीदेखील मोफतच दिली जाणार आहे.

महत्वाचे म्हणजे जे लोक भाड्याच्या घरात राहतात, तेथील पत्ता नाहीय, त्यांनादेखील Ujjwala Yojana 2.0 अंतर्गत गॅस कनेक्शन दिले जाणार आहे. यामुळे कामाचे ठिकाण बदलले किंवा घर बदलले तरी त्यांना कोणतीही समस्या येणार नाही.

या योजनेचा लाभ फक्त महिला घेऊ शकता. त्यांच्याकडे दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड हवे.

अर्जदार महिलेचे वय हे १८ वर्षांपेक्षा जास्त हवे. एकाच घरात या योजनेचे दुसरे कनेक्शन नसावे.

उज्ज्वला योजना 2.0 चा लाभ घेण्यासाठी eKYC असणे गरजेचे आहे. अर्जदार महिलेचे आधार कार्ड, ओळख पत्र चालेल.

कोणत्याही राज्याचे गरीबी रेषेखालील रेशनकार्ड. यामध्ये असलेल्या कुटुंबातील सदस्यांचे आधार. बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी नंबर.

अर्जदारांना pmuy.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

ऑनलाइन पोर्टल pmuy.gov.in वरील वर दिलेल्या Apply For New Ujjwala 2.0 Connection वर क्लिक करावे.

इथे तुम्हाला तीन पर्याय दिसतील इंडेन, भारत पेट्रोलियम आणि एचपी. तुमच्या पसंतीनुसार कंपनी निवडावी आणि अन्य आवश्यक माहिती भरावी.

जर ऑनलाईन शक्य नसेल तर तुम्ही तो फॉर्म डाऊनलोड करून हाताने भरून जवळच्या गॅस एजन्सीकडे देता येईल.

तुमचे सर्व कागदपत्र व्हेरिफाय झाल्यावर तुम्हाला सरकारकडून मोफत गॅस कनेक्शन दिले जाईल.