खिशात होते फक्त 30 रुपये, सिमकार्ड विकून 'त्याने' सुरू केली कंपनी; आता आहे कोट्यवधींचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 11:45 AM2023-02-25T11:45:53+5:302023-02-25T12:00:18+5:30

Oyo Founder Ritesh Agarwal : रितेश यांना घरातही जोरदार विरोध झाला. पण त्यांनी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या गोष्टींची पर्वा केली नाही.

देशातील Youngest Self Made Billionaire म्हणून आपला ठसा उमटवणारे ओयो रूम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत, याचे कारण त्यांचा नवीन व्यवसाय किंवा कंपनी नसून त्यांचं लग्न आहे, रितेश मार्च 2023 मध्ये लग्न करणार आहेत.

आपली भावी पत्नी आणि आईसह पंतप्रधान मोदींना लग्नाची पत्रिका देण्यासाठी ते गेले होते. पीएम मोदींनीही त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या प्रेमाने भेट घेतली, या भेटीचे फोटो स्वत: रितेश यांनी सोशल अकाऊंटवर पोस्ट केले आहेत, ज्यात एका फोटोमध्ये ते मोदींच्या पाया पडताना दिसत आहेत.

हा फोटो व्हायरल होताच लोक रितेश यांचे कौतुक करत आहेत. लोक त्यांच्या साधेपणा आणि सभ्यतेबद्दल बोलत आहेत, रितेश अग्रवाल यांच्या पत्नीबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु फोटोमध्ये त्या खूप सुंदर आणि आनंदी दिसत आहेत. रितेश अग्रवाल यांनी स्वतःच्या बळावर कोट्यवधींची कंपनी उभी केली आहे.

असं म्हटलं जातं की, जर एखाद्याचा हेतू चांगला असेल आणि आत्मविश्वास असेल तर माणूस त्याचं स्वप्न सत्यात बदलू शकतो, रितेश अग्रवाल हे त्याचच एक उत्तम उदाहरण आहे, पंतप्रधान मोदींनी देखील त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी 'मन की बात'मध्ये त्यांचा उल्लेख केला आहे.

1993 मध्ये ओडिशात जन्मलेले रितेश अग्रवाल एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्याच्या आई-वडिलांना त्यांना इंजिनियर बनवायचे होते आणि म्हणून त्यांनी दहावी पास झाल्यावर लगेचच त्यांना कोटा येथे शिकायला पाठवले पण रितेश यांना तिकडे आवडले नाही आणि ते कोटाहून दिल्लीला गेले.

रितेश यांना घरातही जोरदार विरोध झाला. पण त्यांनी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी या गोष्टींची पर्वा केली नाही, जेव्हा ते दिल्लीला गेलो तेव्हा त्यांच्या खिशात फक्त 30 रुपये होते. वयाच्या 19 व्या वर्षी मोठ्या व्यवसायाचे स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करणे सोपे नव्हते, पण त्यांनी हार मानली नाही.

रितेश यांना उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर सिमकार्ड विकावे लागले. याचदरम्यान त्यांना केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आणि 2013 मध्ये त्यांची थिएल फेलोशिपसाठी निवड झाली, या फेलोशिपमध्ये त्यांना 75 लाख रुपये मिळाले.

रितेश यांच्या आयुष्याला तेथेच कलाटणी मिळाली आणि त्यांनी स्टार्टअप सुरू केले. या कंपनीचे नाव OREVAL Stays होते. ही कंपनी प्रत्येक लहान-मोठ्या शहरांतील लोकांना स्वस्त दरात हॉटेल बुकिंग सेवा पुरवते.

OREVAL Stays या नावाचा त्यांना फारसा फायदा झाला नसला तरी त्यानंतर त्यांनी या कंपनीचे नाव बदलून OYO Rooms असे ठेवले, ज्याने यशाचा नवा इतिहास लिहिला आणि अवघ्या 8 वर्षात ही कंपनी 75 हजार कोटींची झाली आणि आज ही कंपनी 80 देशांत व्यवसाय आहे.

रितेश 1.1 अरब डॉलर संपत्तीचे मालक आहेत, यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही रितेश आपली संस्कृती विसरले नाहीत, ते आजही साधे जीवन जगतात. त्यांच्या या यशातून अनेकांना प्रेरणा मिळते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.