ज्या प्रकारच्या आत्मघाती ड्रोनने पाकिस्तानात हाहाकार उडविला, DRDO त्याचे स्टील्थ व्हर्जन आणतेय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:34 IST2025-05-21T12:29:50+5:302025-05-21T12:34:21+5:30
Operation Sindoor, India vs pakistan War: आत्मघाती ड्रोनची स्टील्थ आवृत्ती लवकरच सैन्याच्या दिमतीला येणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताच्या ज्या ड्रोनने पाकिस्तानात घुसून हाहाकार उडविला, त्या आत्मघाती ड्रोनची स्टील्थ आवृत्ती लवकरच सैन्याच्या दिमतीला येणार आहे. या खतरनाक ड्रोनने चीनचीही झोप उडविली आहे. डीआरडीओ या कामिकेज प्रकारच्या ड्रोनवर काम करत असून याचे नाव स्विफ्ट के असे ठेवण्यात आले आहे.
भारताचा हा पहिला कामिकेज ड्रोन आहे. ज्याचा वेग ०.६ मॅक म्हणजेत ७३५ किमी प्रतितास एवढा प्रचंड आहे. हा एवढा शक्तीशाली आहे की तो कित्येक किमीचे अंतर पार करू शकतो. लक्ष्यावर अचूक वार करून स्वत:च नष्ट होतो.
स्विफ्ट म्हणजे स्टील्थ विंग फ्लाईंग टेस्टबेड असे या प्रोग्रॅमचे नाव आहे. यामध्ये स्फोटके असतात, ती वाहून नेण्यासाठी ईलेक्ट्रीक मोटर, फॅन आणि बॅटरी असते. याची क्षमता जी पाकिस्तानने अनुभवली. हा ड्रोन पाकिस्तानची चिनी बनावटीची एअर डिफेन्स सिस्टीम एचक्यू ९ ला उध्वस्त करू शकतो.
हा ड्रोन पूर्णपणे ऑटोनॉमस असून त्याला नियंत्रित करण्यासाठी पायलटची गरज नाही. या ड्रोनचे डिझाईनच असे आहे की रडारही त्याला पकडू शकत नाहीत.
सध्या हा ड्रोन रनवेवरून झेपावू शकतो. परंतू, भविष्यात या ड्रोनला जागेवरून उडण्यासाठी बुस्टर किंवा कॅटपॉल्ट लाँचरची मदत घेता येईल. जेणेकरून तो कुठूनही वापरता येणार आहे.
हा ड्रोन खूप उंचावरही उडू शकतो. २०० किमी अंतरापर्यंत कमांड घेऊ शकतो. जवळपास १ तास तो उडू शकतो. म्हणजेच ७०० किमीचे अंतर तो पार करू शकतो.
ड्रोनमधून क्षेपणास्त्रे, बॉम्ब आणि गायडेड वॉरहेड डागता येतात. या ड्रोनमध्ये स्वदेशी कावेरी इंजिन बसवले आहे.