शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वत:चा पेट्रोलपंप खोला, बंपर कमाई करा; Reliance Jio 3500 नवे पेट्रोल पंप वाटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 7:00 PM

1 / 11
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मल्टीनॅशनल पेट्रोलिअम कंपनी ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) आता जियो बीपी (Jio-BP) ब्रँडद्वारे पेट्रोल-डिझेलची विक्री करणार आहे. यासाठी देशभरात 3500 नवीन पेट्रोल पंप उघडण्यात येणार आहेत. पेट्रोल पंप सुरु करून चांगल्या कमाईची संधी आता चालून आली आहे.
2 / 11
रिलायन्स बीपी (Reliance-BP) पेट्रोल पंप (Petrol pump) च्या बाबतीत सर्व माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. https://www.reliancepetroleum.com/businessEnquiry ही लिंक आहे. येथे तुम्हाला सारी माहिती मिळणार आहे. पेट्रोल पंपाशिवाय तुम्ही पेट्रोलियम पदार्थांची डिलरशीपही मिळवू शकणार आहात.
3 / 11
लुब्रीकंट्स, ऑईल आदी उत्पादने विक्री करता येणार आहेत. ट्रांस कनेक्‍ट फ्रेंचाइजी, ए1 प्‍लाजा फ्रेंचाइजी, एव्हीएशन फ्यूअलपासून अन्य़ उत्पादनांसाठी कंपनीसोबत काम करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
4 / 11
यासाठी काही सोप्या अटी आहेत. जर तुम्हाला रिलायन्सची ही फ्रेंचाइजी घ्यायची असेल तर अर्ज करू शकणार आहात यासाठी तुम्हाला काही माहिती द्यावी लागणार आहे.
5 / 11
यामध्ये नाव, नंबर, पत्ता, ज्या शहरासाठी हवी ते शहर आणि तुम्ही कोणते काम करता याची माहिती द्यावी लागणार आहे. याशिवाय पेट्रोल पंप उघडण्यासाठी जे देशात नियम आहेत ते लागू होणार आहेत .
6 / 11
पेट्रोल पंप घेणाऱ्या व्यक्तीचे वय 21 ते 60 वर्षे असायला हवे. याशिवाय या व्यक्तीकडे 10 वी पासचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
7 / 11
जियो-बीपी पेट्रोल पंपासाठी अर्ज केल्यानंतर कंपनी तुमची कागदपत्रे तपासणार आहे. यावेळी तुम्ही ज्या ठिकाणी पेट्रोल पंप टाकणार आहात त्या जागेची माहितीही तपासली जाणार आहे. ही जमीन प्रत्यक्ष येऊन पाहिली जाईल.
8 / 11
जर ही जमीन कंपनीच्या नियमांत, लांबी-रुंदीला बसली तर 1 महिन्याच्या आतच पेट्रोल पंप डीलरशिपची ऑफर मिळणार आहे.
9 / 11
मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्री आणि ब्रिटिश पेट्रोलियमशी हातमिळवणी केल्याची घोषणा केली होती. ही कंपनी जिओ (JIO) सोबत मिळून काम करणार आहे. तसेच देशभरात इंधनाची विक्री केली जाणार आहे.
10 / 11
रिलायन्सने यासाठी रिलायन्स बीपी-मोबिलिटी लिमिटेड (आरबीएमएल) असे संयुक्त नाव दिले आहे. या भागिदारीमुळे पुढील पाच वर्षांत 60 हजार रोजगार निर्माण होणार आहेत
11 / 11
बीपीने गेल्या वर्षी रिलायन्सचे 1400 पेट्रोलपंप आणि विमान इंधनाचे स्टेशनमध्ये 49 टक्के भागिदारी खरेदी केली होती. यासाठी 1 अब्ज डॉलर मोजले होते.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओRelianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीPetrol Pumpपेट्रोल पंपPetrolपेट्रोलDieselडिझेल