Maha Kumbh Mela 2025 : आयआयटी बाबा अभय सिंह यांचे पॅकेज किती होते? कॅनडामध्ये लाखोंच्या पगाराची होती नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:22 IST2025-01-16T16:16:27+5:302025-01-16T16:22:40+5:30

Maha Kumbh Mela 2025 : प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाला आहे, यामध्ये जगभरातून लोक सहभागी होत आहेत.

Maha Kumbh Mela 2025 : गेल्या काही दिवसापासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू झाला आहे. जगभरातून अनेक दिग्गज लोक महाकुंभसाठी प्रयागराजमध्ये येत आहेत.

या महाकुंभमध्ये अनेकजण प्रसिद्ध झाले आहेत. यात आता आयआयटीयन बाबा एक प्रसिद्ध झाले आहेत. आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर लाखोंची नोकरी सोडून ते सन्यासी झाले आहेत.

'आयआयटीयन बाबा' यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल उघडपणे सांगितले आहे. ते कॅनडामध्ये काम करून परतले आणि त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. लाखो रुपयांचा पगार सोडून भारतात परतले आहेत.तर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी अनेक महिन्यांपासून संपर्काही साधलेला नाही.

अभय सिंह हे हरयाणातील झज्जरमधील ससरौली गावचे रहिवासी आहेत. त्यांनी आयआयटी मुंबईमधून शिक्षण घेतले आहे.

एका मुलाखतीवेळी ते म्हणाले, 'मी १० तारखेला महाकुंभमेळ्याला आलो होतो. मी स्वतःला संत मानत नाही, साधूही मानत नाही. तुम्ही मला बैरागी म्हणू शकता, पण मग तुम्ही मला विचारता की मी दीक्षा घेतली की नाही, मी संन्यास घेतला की नाही. ज्यांनी ते समजावून सांगितले ते माझे गुरु झाले.

अभय सिंह म्हणाले, 'मी आयआयटी बॉम्बेमधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक केले आहे.' त्यानंतर आयआयटी मुंबईमधून व्हिज्युअल कम्युनिकेशन केले. बी.टेक वेळी दर्शन शास्त्रचा कोर्स पूर्ण केला होता.

अभय सिंह म्हणाले, काही वर्षांपासून कॅनडामध्ये काम करत होतो. 'मला एक बहीण आहे जी दोन वर्षांनी मोठी आहे. ती पण कॅनडामध्ये आहे. ३ वर्षे काम केल्यानंतर कॅनडाहून परतलो. मी पाश्चात्य संस्कृतीत राहिलो आहे आणि ते सर्व वरवरचे आहे. कॅनडामध्ये मला दरमहा ३ लाख रुपये पगार होता. पण तिथेही खर्च तेवढाच होता.

अभय सिंह पुढे म्हणाले, 'असं वाटलं की पैसे कमवण्यात काही फायदा नाही, तुम्हाला जास्त आनंद मिळणार नाही.' या व्यावसायिकांकडे खूप पैसा आहे पण ते आनंदी नाहीत. तेव्हा ते वेड होते, आवडीच्या मागे न जाता. तुम्हाला आवडणारे काम तुम्ही केले तर तुम्ही अधिक आनंदी व्हाल. मी ट्रॅव्हल फोटोग्राफी, फिल्म मेकिंग, मार्केटिंग केले, पण नंतर मला या सगळ्याचा कंटाळा आला.

"मी घरी बसून सद्गुरूंचे अनुष्ठान करायचो, ध्यान करायचो. त्यांना वाटले की हा मुलगा हरवला आहे, तो बाबा होईल आणि कुठल्यातरी गुहेत बसलेला असेल. मी म्हणालो की, मी ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, ती काय आहे. जर तुम्ही प्रयत्न केला नाही तर तुम्हाला कसे समजेल.... ध्यान करून तुम्ही बाबा होणार नाही, असे होत नाही.'

यावेळी अभय सिंह यांना कुटुंबाबात प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, मला कुटुंबाची आठवण येत नाही. 'आता फक्त महादेव आहे'. सुमारे दीड वर्षांपासून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलले नव्हते. ते कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहेत.