'या' राज्यातील लोकांचे सरासरी वय सर्वात जास्त; जाणून घ्या, कितव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 02:42 PM2021-10-17T14:42:31+5:302021-10-17T14:49:45+5:30

आपला देश एवढा विशाल आणि विविधतेने नटलेला आहे, की येथील राज्‍यांची भौगोलिक, सांस्‍कृतिक आदी स्थितीतही मोठ्या प्रमाणात अंतर आहे. याचा तेथील लोकांच्या सरासरी वयावरही मोठा प्रभाव पडतो.

ज्या प्रकारे, प्रत्येक देशातील चाली-रीती, हवामान आणि अन्न-पाणी यांमुळे लोकांचे सरासरी वय (Average Age) कमी-अधिक असते. अगती याच पद्धतीने भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्येही लोकांचे सरासरी वय वेग-वेगळे आहे. (Citizens Average Age In India )

आपला देश एवढा विशाल आणि विविधतेने नटलेला आहे, की येथील राज्‍यांची भौगोलिक, सांस्‍कृतिक आदी स्थितीतही मोठ्या प्रमाणात अंतर आहे. याचा तेथील लोकांच्या सरासरी वयावरही मोठा प्रभाव पडतो. तर जाणून घेऊयात, कोणत्या राज्यांत लोकांचे सरासरी वय सर्वाधिक आहे?

नीती आयोगाच्या 2010 ते 2014 पर्यंतच्या अहवालाच्या आधारे बोलायचे झाल्यास, केरळमधील लोक सर्वाधिक जगतात. योथील लोकांचे सरासरी वय 74.9 वर्ष एवढे आहे.

दिल्‍ली दुसऱ्या स्थानावर - सर्वाधिक प्रदूषण असलेल्या दिल्लीतही लोकांचे सरासरी वय अधिक आहे. या बाबतीत दिल्लीचा देशात दुसरा क्रमांक लागतो. येथील महिलांचे सरासरी वय 74.7 तर पुरुषांचे सरासरी वय 73.2 वर्ष एवढे आहे.

तिसऱ्या स्थानावर जम्मू-काश्मीर - पृथ्वीवरील स्‍वर्ग अशी ओळख असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील महिलांचे सरासरी वय 74.9 वर्ष तर पुरुषांचे सरासरी वय 72.6 वर्ष एवढे आहे.

चौथ्या क्रमांकावर हिमाचल प्रदेश - येथील महिलांचे सरासरी वय 74.1 तर पुरुषांचे सरासरी वय 71.6 वर्ष एवढे आहे.

पाचव्या क्रमांकावर महाराष्‍ट्र - देशातील सर्वाधिक सरासरी वय असलेल्या राज्यांच्या यादीत, महाराष्‍ट्राचा पाचवा क्रमांक लागतो. येथील महिलांचे सरासरी वय 73.6 वर्ष आणि पुरुषांचे सरासरी वय 71.6 वर्ष एवढे आहे. सर्वात कमी सरासरी वय आसाम राज्यातील लोकांचे आहे. येथील लोकांचे सरासरी वय 63.9 वर्ष एवढे आहे. (सर्व फोटो - सांकेतिक)