Kiran Dembla: वयाच्या ४६ व्या वर्षी दोन मुलांची आई बनली बॉडी बिल्डर, फिटनेस आणि पिळदार शरीर पाहून विस्फारतील डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 13:53 IST
1 / 7आज आपण अशा एका महिलेबाबत जाणून घेणार आहोत जिने वयाच्या ४६ व्या वर्षी फिटनेसच्या क्षेत्रात असे काही करून दाखवले की ज्याच्यापुढे टायगर श्रॉफ, विद्युत जामवालसारख्ये आजचे स्टार्सही फिके वाटतील. या महिलेचं नाव आहे किरण देम्बला. तिचा फिटनेस आणि पिळदार शरीर पाहून डोळे विस्फारल्यावाचून राहणार नाहीत. मात्र किरणचं शरीर सुरुवातीपासून असं नव्हतं. तिने कठीण परिस्थितीमध्ये दोन मुलांना जन्म दिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बदल घडवून आणला. पाहुयात तिचे काही खास फोटो. 2 / 7किरण देम्बला ही एकेकाळी कुठल्याही सामान्य गृहिणीप्रमाणेच होती. ती आपल्या दोन मुलांसह सुखी जीवन जगत होती. मात्र त्याचवेळी अचानक तिच्या मेंदूत रक्ताच्या गाठी सापडल्याचा धक्कादायक रिपोर्ट आला. या आजाराने तिचं जीवनच बदलून टाकलं. त्यावेळी उपचार करताना तिचं वजन सुमारे ७५ किलोपर्यंत पोहोचलं होतं. 3 / 7या दरम्यान, दीर्घ आजार आणि वजन वाढल्यामुळे तिला मानसिक तणावाचा सामना करावा लागला. या परिस्थितीमध्ये किरणने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. २००७ मध्ये किरणने योगा क्लासच्या माध्यमातून केवळ ६-७ महिन्यांमध्ये २५ किलो वजन घटवून दाखवले.4 / 7सन २०१३ मध्ये किरणने बुडापेस्ट येथे झालेल्या वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना सहावे स्थान मिळवले. 5 / 7आज किरण एक यशस्वी सेलेब्रिटी फिटनेस एक्स्पर्ट्स बनली आहे. दक्षिणेतील इंडस्ट्रीमधील ती एक मोठं नाव आहे. तसेच तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, राजमौली यांच्यासारख्या दिग्गजांची ती फिटनेस ट्रेनर आहे. 6 / 7हा फोटो पाहून तुम्हाला धक्का बसेल. कारण किरणचा फिटनेस पाहून ती दोन मोठ्या मुलांची आई आहे, यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. 7 / 7फिटनेससोबत किरणचं नाव म्युझिक इंडस्ट्रीमध्येही खूप फेमस आहे. ती एक प्रसिद्ध डीजे आहे. त्याबरोबरच ती एक माऊंटेनर, मोटिव्हेशनल स्पीकर आणि फोटोग्राफर आहे.