शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 16:51 IST

विद्या कावरे यांना ११ मते मिळाली, तर महायुतीचे अशोक चेडेंना ६ मतेच मिळाली. यानिवडणुकीत माजी नगराध्यक्ष विजय औटींनी राष्ट्रवादीचा व्हिप धुडकावत महायुतीच्या उमेदवाराला मतदान केले. 

Parner Nagar Panchayat News: पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या डॉ. विद्या बाळासाहेब कावरे या बहुमताने विजय झाल्या. त्यांनी ११ विरुद्ध ६ मते मिळवत विजयाचा गुलाल उधळला. त्यांच्या विजयाने महायुतीच्या राजकीय घोडेबाजाराला चपराक बसली. ११ नगरसेवकांची एकजूट कायम ठेवत खासदार नीलेश लंकेंनी आपलं वचर्स्व कायम असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते योगेश मते यांचा व्हिप धुडकावत महायुतीचे उमेदवार नगरसेवक अशोक चेडे यांच्या बाजुने मतदान केले. पण, चेंडेना पराभवाला सामोरे जावे लागले. 

पारनेरचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशीया यांच्या देखरेखाली सोमवारी (१० नोव्हेंबर) विशेष सभा घेण्यात आली. उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. 

हात वर करून मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत डॉ. कावरे यांना ११ मते, तर विरोधी नगरसेवक अशोक चेडे यांना ६ मते मिळाली आहे. 

मविआची मते एकसंध

‌‌या राजकीय घडामोडीत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकदिलाने मतदान करून पक्षनिष्ठा अबाधित ठेवली. 

नितीन अडसूळ, जायदा शेख, सुरेखा भालेकर, योगेश मते, भूषण शेलार, प्रियंका औटी, निता औटी, सुप्रिया शिंदे, हिमानी नगरे, विद्या गंधाडे आणि स्वतः डॉ.विद्या कावरे सह ११ नगरसेवकांनी मतदान करून विजय निश्चित केला.

विरोधी उमेदवार अशोक चेडे यांना विजय सदाशिव औटी, युवराज पठारे, निता ठुबे, नवनाथ सोबले आणि कांताबाई ठाणगे या ६ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला.

मविआचे नगरसेवक गळाला लावण्याचे महायुतीकडून झाले प्रयत्न

‌‌महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नगरसेवकांना ‘गळाला लावण्यासाठी’ मोठआ घोडेबाजाराच्या चर्चा पारनेर शहरात जोरात रंगली होती, तरीसुद्धा आघाडीचे नगरसेवक ठाम राहिले. 

राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते योगेश मते यांनी शनिवारी ९ नगरसेवकांना व्हिप बजावत डॉ. विद्या कावरे यांनाच मतदान करावे असे निर्देश दिले होते. या व्हिपचे काटेकोर पालन करत आघाडीने एकजुट दाखविली.

नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डॉ. विद्या कावरे यांचा नगरपंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला. समर्थकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. महाविकास आघाडीच्या या विजयाने पारनेरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.

खासदार लंके म्हणाले, 'हा तर निष्ठेचा विजय'

या विजयानंतर बोलताना खासदार नीलेश लंके म्हणाले, 'राजकारणात निष्ठा सर्वांत मोठी असते. लाखो रुपयांची आमिषे असतानाही आघाडीचे नगरसेवक डगमगले नाहीत, हीच खरी आमची ताकद आहे. डॉ. विद्या कावरे यांच्या विजयाने आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या विजयाची नांदी झाली आहे.'

English
हिंदी सारांश
Web Title : Lankeni Retains Nagar Panchayat Despite Split; Dr. Kavare Elected President

Web Summary : Dr. Vidya Kavare of Maha Vikas Aghadi won Parner Nagar Panchayat president election. Despite cross-voting, she secured victory, defeating the Mahayuti candidate. This win underscores Nilesh Lanke's leadership and signals new political equations in Parner.
टॅग्स :ParnerपारनेरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीnilesh lankeनिलेश लंकेLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक