Hidden Camera: गुपचूप कुणी तुमच्या खासगी क्षणांचं रेकॉर्डिंग करत नाही ना? असा घ्या शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 08:36 PM2022-08-20T20:36:03+5:302022-08-20T20:39:43+5:30

Hidden Camera: हिडन कॅमेरा म्हणजे स्पाय कॅमेऱ्याचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. अशा प्रकारच्या कॅमेऱ्याचा वापर हा गुपचूप कुणाचे तरी फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी केला जातो. अशा प्रकारच्या कॅमेऱ्याचा वापर हॉटेल, पीजी, हॉस्टेल, चेंजिंग रूम अशा कुठल्याही ठिकाणी केला जाऊ शकतो.

हिडन कॅमेरा म्हणजे स्पाय कॅमेऱ्याचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. अशा प्रकारच्या कॅमेऱ्याचा वापर हा गुपचूप कुणाचे तरी फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी केला जातो. अशा प्रकारच्या कॅमेऱ्याचा वापर हॉटेल, पीजी, हॉस्टेल, चेंजिंग रूम अशा कुठल्याही ठिकाणी केला जाऊ शकतो.

या कॅमेऱ्याचा गैरवापर केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अशा कॅमेऱ्याच्या नजरेत येऊन संभाव्य त्रास टाळण्यासाठी काही गोष्टींबाबत खबरदारी घेणं आवश्यक आहे. काही विशिष्ट्य काळजी घेतल्यास तुम्ही सहजपणे छुप्या कॅमेऱ्याचा शोध घेऊ शकता. जाणून घेऊयात याबाबतची सोपी पद्धत.

असे कॅमेरे कुठेही ठेवता येत नाहीत. त्यामुळे ते काही विशिष्ट्य ठिकाणी लपवले जातात. असे कॅमेरे स्मोक डिटेक्टर, एअर फिल्टर, पुस्तके, घड्याळ, स्टफ्ड टेडी, टीव्ही बॉक्स, हेअर ड्रायर, पेन किंवा कुठल्या तरी वॉल डेकोरमध्ये लपवले जातात.

काही प्रकरणांमध्येही हे कॅमेरे शॉवर, खोलीचे छत, डेस्क प्लाण्टमध्ये लपवले जातात. जर तुम्ही कुठे बाहेर थांबणार असाल तर या जागा एकदा तपासून घ्या.

काही ठिकाणी नाईट व्हिजन कॅमेऱ्यांचाही वापर केला जातो. अशा प्रकारचे कॅमेरे तुम्ही अगदी सहजपणे शोधू शकतात. नाईट व्हिजन कॅमेऱ्यामध्ये हिरवी किंवा लाल एलईडी लाईट लावलेली असते. अशा कॅमेऱ्यांचा शोध घेण्यासाठी तुम्हाला खोलीतील लाईट बंद करावी लागेल, असं केल्यानंतर हे कॅमेरे चमकू लागतील.

यासाठी तुम्ही स्मार्टफोन्सची मदतही घेऊ शकता. मात्र त्याचे रिझल्ट १०० टक्के अचूक येत नाहीत. त्यासाठी तुम्ही काही टिक्सचा वापर करू शकता. कॅमेऱ्यामधून रेडियो फ्रिक्वेंसी जनरेट होत असते. त्यामुळे तुम्ही या कॅमेऱ्यांचा शोध घेऊ शकता.

अशा प्रकारे तुम्हाला मोबाईलवरून फोन करावा लागेल. फोन करून तुम्ही जेव्हा कॅमेरा असलेल्या जागी जाल तेव्हा सिग्नल डिस्टब होईल. म्हणजेच फोनवर बोलण्यामध्ये अडचणी येतील.

त्याशिवाय तुम्ही काही अॅप्सचीही मदत घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही डिटेक्ट हिडन कॅमेरा किंवा अन्य कुठलेही अॅप डाऊनलोड करू शकता. त्यानंतर अॅप ओपन करून एरिया स्कॅन करावा लागेल. जर त्या एरियामध्ये कुठेही कॅमेरा दिसला तर स्क्रीनवर रेड ग्लो येतो. मात्र असे अॅप्स १०० टक्के अचूक असतील याची कुठलीही हमी नाही.