भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:36 IST2025-07-02T15:28:23+5:302025-07-02T15:36:26+5:30
Rakesh Sharma: भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांनी १९८४ साली रशिया आणि इस्रोच्या संयुक्त मोहिमेंतर्गत अंतराळात झेप घेत इतिहास रचला होता. दरम्यान, राकेश शर्मा हे पुढच्या काळात प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यामुळे ते सध्या कुठे आहेत, तसेच काय करतात याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सर्वसामान्यांच्या मनात नेहमी दिसून येते.

भारताचे दुसरे अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे ऑक्सिओम मोहिमेंतर्गत सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर वास्तव्यास आहेत. तिथे ते विविध प्रयोगांमध्ये सहभागी होत आहेत. दरम्यान, शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेमुळे देशाचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या आठवणीही ताज्या झाल्या आहेत.
राकेश शर्मा यांनी १९८४ साली रशिया आणि इस्रोच्या संयुक्त मोहिमेंतर्गत अंतराळात झेप घेत इतिहास रचला होता. आपल्या ७ दिवस २१ तास आणि ४० सेकंदांच्या अंतराळातील वास्तव्यात शर्मा यांनी विविध प्रयोग केले होते. दरम्यान, राकेश शर्मा हे पुढच्या काळात प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्यामुळे ते सध्या कुठे आहेत, तसेच काय करतात याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सर्वसामान्यांच्या मनात नेहमी दिसून येते.
राकेश शर्मा यांचा जन्म १३ जानेवारी १९४९ रोजी पंजाबमधील पतियाळा येथे झाला होता. पुढे प्राथमिक शिक्षण घेतल्यावर ते एनडीएमध्ये दाखल झाले. तिथून त्यांची भारतीय हवाई दलात निवड झाली. १९७१ च्या युद्धातही त्यांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, १९८२ मध्ये राकेश शर्मा यांची रशियाच्या युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. तसेच ३ एप्रिल १९८४ रोजी ते दोन रशियन अंतराळवीरांसह सोयूझ टी-११ या यानामधून अंतराळाकडे झेपावले.
अंतराळात पोहोचल्यावर इंदिरा गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधत तिथून भारत कसा दिसतो असं विचारलं होतं. तेव्हा सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा असं अजरामर उत्तर त्यांनी दिलं होतं.
दरम्यान, अंतराळातून परतल्यावर राकेश शर्मा यांनी अनेक वर्षे नियमित नोकरी केली. तसेच २००१ मध्ये ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर आता ते तामिळनाडूतील कुन्नूर जिल्ह्यात वास्तव्यास गेले. येथील निसर्गसंपन्न परिसरात ते एका शांत ठिकाणी पत्नीसह आनंदात राहत आहेत.
राकेश शर्मा हे आता प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असले तरी देशाला त्यांनी दिलेल्या योगदानाची जाणीव आहे. तसेच भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाशी निगडित आहेत. इस्त्रोच्या गगनयान मोहिमेच्या नॅशनल स्पेस अॅडव्हायजरी कौन्सिलचे ते सदस्य आहेत. तसेच आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून ते भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला दिशा देत आहेत.