'हे' वाचून तुम्हीही म्हणाल, पाकिस्तान कोणतेही संबंध ठेवण्यास लायक नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 15:14 IST2019-02-22T15:06:51+5:302019-02-22T15:14:41+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2015 पाकिस्तानचा दौरा केला. त्यावेळी नवाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान होते. दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत यासाठी परदेशातून परतत असलेले मोदी अचानक वाट वाकडी करुन लाहोर विमानतळावर पोहोचले. तिथे शरीफ यांनी त्यांचं स्वागत केलं. मात्र त्यानंतरही पाकिस्तान 'शरीफ' झाला नाही.

पाकिस्तानमधील रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अनेकांना मेडिकल व्हिसा दिला. दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत, यासाठी स्वराज यांनी पाकिस्तानच्या रुग्णांना वेळोवेळी मदत केली.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी त्यांना मदत देण्याची भूमिका सुधींद्र कुलकर्णी यांनी मांडली होती. ते पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे राजकीय सल्लागार होते.

2005 मध्ये पाकिस्तानला भूकंपाचा धक्का बसला. त्यावेळी भारतानं पाकिस्तानला 25 टन मदत पाठवली होती. इन्फोसिस कंपनीनं पाकिस्तानला 2,26,000 अमेरिकन डॉलरची मदत देऊ केली होती. भारतानं पाकिस्तानला लष्करानं वैद्यकीय मदत, 15 हजार ब्लँकेट आणि 50 तंबू मदत म्हणून दिले.

येमेनमध्ये अंतर्गत यादवी उफाळून आल्यानं अडकून पडलेल्या पाकिस्तानी नागरिकांची सुटका भारतानं केली होती.

पाकिस्तानी मुलगा चुकून सीमा ओलांडून भारतात आला होता. त्याला मायदेशी पाठवताना भारतीय लष्करानं मिठाई दिली होती. मात्र यानंतरही पाकिस्ताननं संबंधांमधील कटूता संपवली नाही.

जम्मू काश्मीरमध्ये पूर आला त्यावेळी भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानी नागरिकांचीही मदत केली होती.

















