Indian Railway: १० वी पाससुद्धा चालवू शकतात ट्रेन, कसं बनता येतं लोको पायलट, कशी मिळेल नोकरी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 04:07 PM2023-03-08T16:07:12+5:302023-03-08T16:11:38+5:30

Indian Railway: जर तुम्हीही तुमच्या करिअरबाबत संभ्रमित असाल तर तसेच सरकारी नोकरीसाठी आवश्यक असलेली पात्रता आपल्याकडे नाही, असं वाटत असेल तर तुमच्यासाठी लोको पायलटचा जॉब हा एक उत्तम पर्याय आहे. या नोकरीसाठी १० वी पास उमेदवारसुद्धा अर्ज करू शकता. त्याबाबतची माहिती पुढील प्रमाणे आहे.

जर तुम्हीही तुमच्या करिअरबाबत संभ्रमित असाल तर तसेच सरकारी नोकरीसाठी आवश्यक असलेली पात्रता आपल्याकडे नाही, असं वाटत असेल तर तुमच्यासाठी लोको पायलटचा जॉब हा एक उत्तम पर्याय आहे. या नोकरीसाठी १० वी पास उमेदवारसुद्धा अर्ज करू शकता. त्याबाबतची माहिती पुढील प्रमाणे आहे.

ट्रेनच्या ड्रायव्हरला लोको पायलट म्हटलं जातं. लोको पायलटच्या नोकरीला भारताने ग्रुप बी विभागात ठेवले आहे. भारतीय रेल्वेमध्ये रेल्वेच्या संचालनाची जबाबदारी ही एका लोको पायलटचीच असते.

लोको पायलट बनण्यासाठी इच्छुक उमेदवाराने कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून १०वी किंवा १२वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असली पाहिजे. त्याशिवाय त्या उमेदवाराने नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग किंवा स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगकडून स्वीकृत संस्थेतून आयटीआय प्रोग्रॅममध्ये पात्र असणेही अनिवार्य आहे.

तसेच पात्रतेचा विचार केल्यास इच्छुक उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे. त्याशिवाय जनरल कॅटॅगरीतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही १८ ते ३० वर्षे एवढी निश्चित करण्यात आली आहे. तर आरक्षित कॅटॅगरीतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात आली आहे.

त्याशिवाय भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलटची भरती केली जाते. अशा परिस्थिती जेव्हा भरती निघेल तेव्हा तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता.

तर लोको पायलटच्या पदासाठी तुमची निवड ही लेखी परीक्षा, इंटरव्यू आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर होते. जर तुम्ही या सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालात तर तुमची निवड लोको पायलटच्या पदासाठी होऊ शकते.