जी-20 परिषदेसाठी सर्वाधिक खर्च करणारा भारत तिसरा देश, हजारो कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 01:16 PM2023-09-10T13:16:45+5:302023-09-10T13:35:32+5:30

भारताने यावर्षीच्या जी२० शिखर परिषदेचे आयोजन केले असून राजधानी दिल्लीत जय्यत तयारी आणि ग्रँड नियोजन करण्यात आलंय.

भारताने यावर्षीच्या जी२० शिखर परिषदेचे आयोजन केले असून राजधानी दिल्लीत जय्यत तयारी आणि ग्रँड नियोजन करण्यात आलंय.

जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, जर्मनी इत्यादींसह सुमारे ३० देशांचे प्रमुख आणि १४ आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या परिषदेत सहभागी झाले आहेत.

सुमारे वर्षभरापासूनच आयोजनाची तयारी सुरू होती. अनेक बैठका, सम्मेलने इत्यादींचे आयोजन झाले. एकूणच संपूर्ण आयोजनासाठी प्रचंड खर्च येतो.

जाणून घेऊ या आतापर्यंत जी२० परिषदेच्या आयोजनासाठी कोणत्या देशाने किती खर्च केला. या यादीत पहिल्या क्रमांकावर चीन आहे.

चीनने २०१६ साली या परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी, तब्बल २४० कोटी डॉलर एवढा खर्च चीनने केला होता. चीननंतर कॅनडाचा दुसरा नंबर लागतो.

कॅनडाने जी२० परिषदेसाठी तब्बल १०० कोटी डॉलर रुपये खर्चे केले होते. २०१० मध्ये कॅनडात ही परिषद पार पडली होती.

कॅनडानंतर सर्वाधिक खर्च करणारा देश हा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला असून भारताने सुमारे ५० कोटी डॉलर एवढा खर्च केला आहे. म्हणजे ४,१५६ कोटी खर्च केले

गतवर्षी २०२२ मध्ये इंडोनेशियाने जी २० परिषदेचे आयोजन केले होते, त्यावेळी ३.३ कोटी डॉलर खर्च केला होता. हा आत्तापर्यंतचा सर्वात कमी खर्च आहे.

२०१० पासून या परिषदांच्या आयोजनाच्या खर्चाची माहिती घेतल्यास, १० देशांनी या परिषदांचं आयोजन केलं होतं.

सर्वाधिक खर्च कशावर? सुरक्षा, आदरातिथ्य, नवी दिल्लीचे सौंदर्यीकरण, भारत मंडपम, रस्ते व इतर सुविधा