Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 01:32 PM2024-05-14T13:32:39+5:302024-05-14T13:45:56+5:30

Fact Check: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, या व्हिडिओमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाबाबत शंका उपस्थित करताना दिसत आहेत.

fact check viral video of bihar cm nitish kumar about pm narendra modi victory is old | Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य

Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य

Claim Review : व्हायरल व्हिडिओत नितीश कुमारांनी उपस्थित केली पंतप्रधान मोदींच्या विजयाबाबत शंका
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: Newschecker
Translated By: ऑनलाइन लोकमत

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू आहे. इंडिया आघाडीची मोट बांधणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी काडीमोड घेत भाजपाप्रणित एनडीएला समर्थन दिले. यातच लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचार जोरदार सुरू आहे. यात नितीश कुमार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयावर शंका घेणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ जुना असल्याचे समोर येत आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नितीश कुमार २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या विजयाबद्दल शंका व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. यांसदर्भातील हा दावा व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे. आमच्या तपासणीत आढळले की, व्हायरल व्हिडिओ १० ऑगस्ट २०२२ चा आहे. या दिवशी नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपावर हल्लाबोल केला होता.

२०१४ मध्ये आलेले २०२४ पर्यंत राहतील की नाही सांगू शकत नाही

नितीश कुमार यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे ७ सेकंदांचा आहे. मीडियाशी बोलताना नितीश कुमार सांगतात की, २०१४ मध्ये जे आले आहेत, ते २०२४ पर्यंत राहू शकतील की नाही, ते आम्ही सांगू शकत नाही. एका कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “२०१४ मध्ये आलेले २०२४ पर्यंत राहतील की नाही सांगू शकत नाही - नितीश कुमार. काका पुन्हा पलटी मारायची पूर्ण तयारी करत आहेत. यामुळे वाऱ्याची दिशा कळली आहे.”, असे #BiharCampaign2024pic.twitter.com/SUBgzBGkgW

— Naresh Balyan (@AAPNareshBalyan) May 12, 2024 " target="_blank">कॅप्शन व्हायरल व्हिडिओला देण्यात आले आहे. अर्काइव्ह पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा

भाजपासोबतची युती तोडून नितीश कुमार आरजेडीसोबत गेले

या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी व्हिडिओमध्ये बोलले जाणारे शब्द वापरून कीवर्ड शोध घेतला. तेव्हा १० ऑगस्ट २०२२ रोजी Aaj Tak च्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट दिसला. या रिपोर्टमध्ये १० ऑगस्ट २०२२ रोजी नितीश कुमार यांच्या पक्ष जेडीयूने भाजपासोबतची युती तोडून लालू यादव यांच्या पक्ष आरजेडीसोबत नवे सरकार स्थापन केले असल्याचे सांगण्यात आले. या सरकारमध्ये नितीशकुमार यांना मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले.

नितीश कुमारांचा रोख पंतप्रधान मोदींकडे होता

नितीश कुमार यांनी शपथ घेतल्यानंतर राजभवनात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी नितीश कुमार यांनी भाजपावर सडकून टीका केली होती. यावेळी त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना, “२०१४ मध्ये आलेले २०२४ पर्यंत राहू शकतील की नाही याबाबत काही सांगू शकत नाही”, असे नितीश कुमार यांनी म्हटले होते. नितीश कुमार यांचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता. कारण, २०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळवून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते. आणखी शोध घेतल्यावर ABP News च्या YouTube खात्यावरून १० ऑगस्ट २०२२ रोजी अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. व्हायरल झालेल्या व्हिडिओचा मूळ दीर्घ भाग यामध्ये देण्यात आला होता. 

नितीश कुमारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याबाबत विचारला होता प्रश्न

सुमारे २९ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये बिहार राजभवनात शपथविधीदरम्यान नितीश कुमार मीडियाशी बोलत असल्याचे आढळून आले. २१ मिनिटांच्या सुमारास, जेव्हा एका मीडिया प्रतिनिधीने नितीश कुमार यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले होते की, “आमचा कोणत्याही पदासाठी, उमेदवारीबाबत दावा नाही. पण हे निश्चित आहे की २०१४ मध्ये आलेले २०२४ पर्यंत राहतील की नाही सांगू शकत नाही. याशिवाय, १० ऑगस्ट २०२२ रोजी एनडीटीव्ही इंडियाच्या फेसबुक अकाऊंटवरून अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये नितीश कुमार वरील रिपोर्ट्समध्ये तेच बोलतांना ऐकू येतात.

दरम्यान, नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि भाजपामध्ये दीर्घकाळापासून युती होती. पण २०१३ मध्ये जेडीयूने वैचारिक मतभेदांचे कारण देत भाजपासोबतची युती तोडली. त्यानंतर २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजद आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. पण हे सरकार फार काळ टिकू शकले नाही. नितीश कुमार यांनी २०१७ मध्ये आरजेडीशी संबंध तोडले आणि भाजपासोबत पुन्हा सरकार स्थापन केले. यानंतर दोन्ही पक्षांनी २०२० च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढवून सरकार स्थापन केले. पण २०२२ मध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांनी भाजपासोबतची युती तोडून पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन केले. परंतु, ही युतीही फार काळ टिकली नाही आणि २०२३ मध्ये नितीश कुमार पुन्हा भाजपामध्ये सामील झाले. सध्या जेडीयू आणि भाजप एकत्र लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

निष्कर्ष

आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल व्हिडिओ ऑगस्ट २०२२ चा आहे, जेव्हा नितीश कुमार भाजप सोडून RJD मध्ये सामील झाले होते.

(सदर फॅक्ट चेक Newschecker या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)
 

Web Title: fact check viral video of bihar cm nitish kumar about pm narendra modi victory is old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.