शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

India China Face Off: ...अन् चीनचे सर्व अंदाज साफ चुकले; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचं १० मोठे खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:01 AM

1 / 11
गेल्या आठवड्यात भारत-चीनचं सैन्य लडाखमधील गलवानमध्ये आमनेसामने आलं. त्यावेळी दोन्ही सैन्यांत हिंसक झटापट झाली. त्यामुळे सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेन गुप्तचर यंत्रणेच्या अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. त्यामुळे चीनचा बुरखा फाटला आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या अहवालातून १० मोठे खुलासे झाले आहेत.
2 / 11
गलवानमध्ये झालेला संघर्ष पूर्णपणे नियोजित होता. जनरल झाओ झोंग्की चिनी लष्कराच्या वेस्ट कमांडचे प्रमुख आहेत. त्यांनीच सीमेवरील कारवाईचे आदेश दिले होते.
3 / 11
चिनी सैन्यानं झटापटीत मारल्या गेलेल्या सैनिकांसाठी एक प्रार्थनासभा आयोजित केली. मात्र प्रार्थनासभेशी संबंधित फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर हटवण्यात आले.
4 / 11
जनरल झाओ झोंग्की यांनी याआधी व्हिएतनाम लढाईत आणि २०१७ मध्ये झालेल्या डोक्लाम वादात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
5 / 11
गलवानमध्ये झालेली झटापट पूर्वनियोजित होती. यामध्ये चीनचे जवळपास ३५ सैनिक मारले गेले. भारत शेजारच्या देशांमधील वादात अडकून राहावा आणि अमेरिकेच्या जवळ जाऊ नये, हा चीनचा हेतू आहे.
6 / 11
चीननं गलवान भागात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र साठा ठेवला आहे. याशिवाय काही बांधकामंदेखील केली आहेत. १५ जूनला भारतीय जवान या ठिकाणी पोहोचले. त्यांनी चिनी सैन्याला पोस्ट हटवण्याचं आवाहन केलं. त्यावेळी तिथे आधीपासूनच काही चिनी सैनिक हल्ला करण्याच्या हेतूनं तयार होते. त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे दोन्ही सैन्यात झटापट झाली.
7 / 11
भारतीय सैन्यानं जबरदस्त प्रतिकार केला. चीन सैन्याला हा प्रतिकार अपेक्षित नव्हता. त्यामुळेच चिनी सरकारच्या अधिकृत माध्यमांनीही याबद्दल फारशी माहिती प्रसिद्ध केली नाही.
8 / 11
या घटनेबद्दल सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला मजकूर चीननं सेन्सॉर केला. या झटापटीत फारसं नुकसान होणार नाही, अशी चीनची धारणा होती. मात्र चीनचे जवळपास ३५ सैनिक मृत्यूमुखी पडले.
9 / 11
झटापटीत अपेक्षित यश न मिळाल्यानं, जास्त नुकसान झाल्यानं चिनी माध्यमांनी भारतावर हल्ले सुरू केले. मात्र प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा अंदाज आल्यावर चीननं थोडी मवाळ भूमिका घेतली.
10 / 11
चिनी परराष्ट्र मंत्रालयानं झटापटीचं खापर भारतावर फोडलं. भारतीय जवानांनी सीमा ओलांडली. झटापट त्यांच्याचकडून सुरू झाली. चिनी सैनिकांनी सीमेच्या रक्षणासाठी भारताला प्रत्युत्तर दिलं, असे दावे करण्यात आले.
11 / 11
भारत-चीन सीमेवरील हालचालींकडे अमेरिकेचं बारकाईनं लक्ष असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं आहे. भारत अमेरिकेचा साथीदार आहे. या परिस्थितीत अमेरिका भारतासोबत आहे, अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी दिली आहे.
टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिका