Independence Day: १५ ऑगस्टला राष्ट्रपती नाही तर पंतप्रधान का करतात ध्वजारोहण? हे आहे खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 08:41 PM2022-08-14T20:41:55+5:302022-08-14T20:46:32+5:30

Independence Day: देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या खास औचित्याने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अगदी उत्साहात साजरा होत. आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र मिळाले होते. मात्र १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन तारखांबाबत सर्वसामान्यांचा अनेकदा गोंधळ उडतो. तसेच १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती नाही तर पंतप्रधान का ध्वजारोहण करतात, असाही प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागचं कारण पुढीलप्रमाणे आहे.

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या खास औचित्याने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अगदी उत्साहात साजरा होत. आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून स्वातंत्र मिळाले होते. मात्र १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन तारखांबाबत सर्वसामान्यांचा अनेकदा गोंधळ उडतो. तसेच १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती नाही तर पंतप्रधान का ध्वजारोहण करतात, असाही प्रश्न अनेकांना पडतो. त्यामागचं कारण पुढीलप्रमाणे आहे.

१५ ऑगस्ट रोजी भारताला ब्रिटिशांच्या राजवटीपासून स्वातंत्र मिळालं होतं. तर २६ जानेवारी १९५० पासून भारतामध्ये स्वत:च्या राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली होती. म्हणजेच या दिवासपासून भारत कुठल्याही बाहेरील देशाच्या आदेशांचे पालन करण्यास बांधिल नसेल. तसेच याच राज्यघटनेमुळे नागरिकांना मुलभूत अधिकार मिळाले.

१५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात. या दिवशी ध्वज हा खालून वर दोरीच्या माध्यमातून ध्वजस्तंभावर नेला जातो. त्यानंतर तो फडकवला जातो. त्याला ध्वजारोहण म्हणतात. असं यासाठी केलं जातं. कारण या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. त्यामुळे याला ध्वजारोहण म्हणतात. तर २६ जानेवारी १९५० रोजी देश आधीपासूनच स्वतंत्र होता, त्यामुळे त्या दिवशी सर्वसामान्य पद्धतीने ध्वज फडकवला जातो. याला ध्वजवंदन म्हणतात.

आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला होता. त्यावेळी देशाचे प्रमुख हे पंतप्रधान होते. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले होते. तर २४ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर ते देशाचे घटनात्मक प्रमुख बनले होते. त्यामुळे २६ जानेवारी रोजी देशाचे राष्ट्रपती ध्वज फडकवतात. तसेच हा कार्यक्रमक राजपथ येथे होतो.

ध्वज संहिता २००२ नुसार राष्ट्रध्वज सूर्यास्तापूर्वी खाली उतरवणे आवश्यक असते. मात्र आता या नियमामध्ये सरकारने बदल केला आहे. आता कधीही ध्यवज फडकवू शकता. तसेच सूर्यास्तानंतरही झेंडा फडकवलेला राहू शकतो.