सनकी हुकुमशाह! ज्याच्यामुळं जीव वाचवण्यासाठी पळाले रातोरात श्रीमंत भारतीय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 09:11 PM2023-02-03T21:11:37+5:302023-02-03T21:15:42+5:30

५० ते ६० च्या दशकात युगांडामध्ये भारतीय उद्योगपतींची भरभराट होती. युगांडाची संपूर्ण अर्थव्यवस्था या श्रीमंत भारतीयांच्या जोरावर चालत असे. सुरुवातीला सर्व काही ठीक होते. मग एके दिवशी असा सनकी हुकुमशाह तिथे आला ज्याच्या डोक्यात नेहमी क्रूरता होती.

त्या क्रूर हुकुमशाहचं नाव होतं ईदी अमीन, ज्याला हे अजिबात आवडत नव्हते की बाहेरच्या लोकांनी म्हणजे भारतीय लोकांनी अप्रत्यक्षपणे आपल्या देशात सत्तेच्या समांतर शक्तिशाली आणि प्रभावशाली असावे.

अमीनने अक्षरश: नरसंहार घडवला. अमीनने केवळ भारतीयांनाच आपल्या देशातून हाकलले नाही, तर ज्या कुटुंबांनी भारतीयांना मदत केली त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले. अमीनची राजवट गेल्यानंतर देशात शेकडो ठिकाणी सामूहिक कबरी सापडल्या. त्यामध्ये अनेक मृतदेह पाहून लोकांच्या अंगाचा थरकाप उडाला.

युगांडाचा हा हुकुमशाहा ईदी अमीन याने आपल्या राजवटीत सुमारे ८० हजार भारतीय वंशाच्या लोकांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या बाबतीतही असेच झाले. युगांडातील प्रत्येक कुटुंब, मग ते कितीही प्रभावशाली असले, तरी त्यांना फक्त एक सुटकेस आणि पाच हजार रुपये घेऊन जाण्याची परवानगी होती.

ही सर्व अशी कुटुंबे होती ज्यांच्याकडे कोट्यवधी आणि अब्जावधींची मालमत्ता होती, परंतु त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी हातात केवळ ५ हजार घेऊन देश सोडून पळून जावे लागले. 'स्टेट ऑफ ब्लड - द इनसाइड स्टोरी ऑफ ईदी अमीन' या प्रसिद्ध पुस्तकानुसार अमीनची सत्ता गेल्यावर तेथे सामूहिक कबर सापडल्या होत्या.

या कबरीमध्ये असलेल्या मृतदेहांमध्ये बहुतांश अवयव गायब होते. हे असे का होते हे कोणालाच कळू शकले नाही. पण संशयाची सुई सनकी हुकुमशाह अमीनकडे वळली की त्याच्याच आदेशावरून त्याच्या सेनापतींनी या क्रूर हत्याकांड घडवलं असावं.

त्यावेळी युगांडामध्ये ब्रिटीश राजवट होती. वर्णद्वेषी गोर्‍यांना काळ्या आफ्रिकन लोकांना भेटणे आवडत नव्हते, म्हणून त्यांनी भारतीयांसह आशियाई वंशाच्या लोकांना स्थायिक केले, त्यांचे काम ब्रिटिश आणि आफ्रिकेतील लोकांमध्ये संवाद प्रस्थापित करणे हे होते, इथून पुढे गोष्टी बिघडल्या.

युगांडाला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीयांचा वाईट काळ सुरू झाला. युगांडातील मूळ रहिवासी आणि भारतीय यांच्यातील कटुता शिगेला पोहोचली होती कारण त्यांना वाटले की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यांची स्थिती गुलामांचीच राहिली आहे.

हुकुमशाह ईदी अमीनने याचा फायदा घेतला. आपल्या लोकांच्या मनात पसरलेल्या असंतोषाला आणि निराशेला आपले शस्त्र बनवून त्यांनी भारतीयांना देशातून हाकलून दिले. त्यामुळे कोट्यवधीची संपत्ती असणारे भारतीय जीव मुठीत घेऊन युगांडा सोडून भारतात परतले.