प्रेरणादायी! व्याजाने पैसे घेऊन केली UPSC ची तयारी; IAS होऊन शेतकरी पुत्राची नेत्रदीपक भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 11:17 AM2020-05-15T11:17:40+5:302020-05-15T11:25:27+5:30

आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे व्याजाने पैसे उधार घेऊन UPSC ची तयारी केली आणि परीक्षेत अव्वल यश मिळवत IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं. शेतकऱ्याच्या लेकाने हे सिद्ध करून दाखवलं आहे.

आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे व्याजाने पैसे उधार घेऊन UPSC ची तयारी केली आणि परीक्षेत अव्वल यश मिळवत IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

वीर प्रताप सिंह राघव असं या शेतकऱ्याच्या लेकाचं नाव असून सर्व अडचणींवर मात करत UPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन करून देशात 92 वा क्रमांक पटकावला आहे.

वीर प्रताप सिंह यांचा शेतकऱ्याचा मुलगा ते IAS ऑफिसर हा प्रवास फार प्रेरणादायी आहे. सोशल मीडियावर आपल्या संघर्षाची कहाणी पोस्ट करून राघव यांनी अनेकांचा आत्मविश्वास वाढवला आहे.

यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. तर आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आमि मेहनतीची आवश्यकता असते. याच्या डोरावर सर्व काही साध्य करता येतं असा मोलाचा सल्ला राघव यांनी दिला आहे.

राघव हे बुलंदशहराच्या दलपतपूर गावचे रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याच्या वडिलांनी तीने टक्के व्याजाने एका व्यक्तीकडून पैसे घेतले.

व्याजाने घेतलेल्या पैशांच्या मदतीने राघव यांनी UPSC च्या परीक्षची तयारी सुरू केली आणि ते तिसर्‍या प्रयत्नात म्हणजेच 2018 मध्ये यशस्वी झाले.

2016 आणि 2017 मध्येही परीक्षा दिली होती. 2015 रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठातून बीटेक (मेकॅनिकल इंजिनियरिंग) केलं असल्याची माहिती राघव यांनी दिली आहे.

राघव यांच्या मोठ्या भावाचं IAS होण्याचं स्वप्न होतं. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना ते पूर्ण करता आलं नाही. भावाने वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे यशामध्ये भावाचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

लहानपणापासूनच राघव यांना संघर्ष करावा लागला. घरापासून पाच किमी चालत इयत्ता पाचवीपर्यंतचं शिक्षण घ्यावं लागलं होतं.

वीर प्रताप सिंह यांचे प्राथमिक शिक्षण आर्य समाज शाळा, कोरोरा येथून आणि सहावीपर्यंतचे शिक्षण सूरजभान सरस्वती विद्या मंदिर शिकारपूर येथून झाले.

शेतकऱ्यांचा मुलगा ते IAS चा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. सर्वात मोठी अडचण पैशांची होती पण वडील आणि भावाने मला पाठबळ दिलं आणि प्रबळ इच्छा शक्तीमुळे मी यशस्वी होऊ शकलो असं राघव यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.